मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मानं आयपीएलच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे. त्यानं दिल्लीविरुद्ध आयपीएलमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो विराट कोहली नंतर केवळ दुसरा फलंदाज बनला आहे.
रोहित शर्मानं कोणत्याही संघाविरुद्ध एक हजारहून अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रोहित शर्मानं दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजां चांगलीच फोडून काढली. मात्र, हा विक्रम केल्यानंतर तो 49 धावांवर बाद झाला. रोहित शर्मानं 14 व्या चेंडूवर एक धाव घेत 23 धावांचा टप्पा गाठला. यासह तो आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1000 धावा पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरला. रोहित शर्मानं या आधी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धही ही कामगिरी केली आहे. केकेआरविरुद्ध त्यानं 1040 धावा ठोकल्या आहेत.
आयपीएलमध्ये एक संघाविरुद्ध सर्वाधिक धावा
1134 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पंजाब किंग्ज
1093 – डेव्हिड वॉर्नर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
1057 – शिखर धवन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
1040 – रोहित शर्मा विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
1030 – विराट कोहली विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
1006 – विराट कोहली विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज
1026 – रोहित शर्मा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या शैलीत दिसला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. मात्र दिल्लीविरुद्ध त्यानं सगळी कसर भरून काढली. रोहितनं पहिल्या चेंडूपासूनच आक्रमणाला सुरुवात केली. दुर्दैवानं, त्याचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं, मात्र मुंबईला तुफानी सुरुवात करून दिली. रोहित 27 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्यानं 6 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकले.
सलग तीन सामने गमावल्यानंतर मुंबईला त्यांच्या घरच्या मैदानावर हंगामातील पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत हार्दिकसाठी खेळाडू आणि कर्णधार म्हणून काहीही चांगलं राहिलेलं नाही. सोशल मीडिया तसेच मैदानावर त्याला सतत ट्रोल केलं जातंय. त्यामुळे आपल्या कामगिरीनं टीकाकारांची तोंड बंद करण्याची त्याच्याकडे ही चांगली संधी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
महिला चाहतीनं केला रोहित शर्माच्या पायाला स्पर्श, हिटमॅनही शॉक! पाहा व्हायरल व्हिडिओ
‘तेरे जैसा यार कहां…’, वानखेडेवर पुन्हा भेटले सचिन-सौरव; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
मुंबईविरुद्ध दिल्लीनं टॉस जिंकला, सूर्याचं पुनरागमन; जाणून घ्या प्लेइंग 11