भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी आजचा अर्थात 23 जूनचा दिवस खूप खास आहे. कारण रोहितने आजच्याच दिवशी 2007 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आज त्याच्या पदार्पणाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. चला तर रोहितच्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर एक झलक टाकूया.
रोहितने (Rohit Sharma) 2007 मध्ये 23 जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण (Rohit Sharma International Debut) केले होते. तेव्हापासून त्याचा सुरू झालेला हा प्रवास आजही कायम आहे. या 16 वर्षांमध्ये त्याने स्वत:ला भारतीय संघाचा विश्वासू खेळाडू म्हणून सिद्ध केले आहेत. इतकेच नव्हे तर तो सध्या क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात सध्या भारतीय संघाचा कर्णधारही आहे. अशात आपल्या या दैदिप्यमान कारकिर्दीला 16 वर्षे पूर्ण झाल्याने (Rohit Sharma 16 Years Of Career) रोहित भावूक झाला आहे.
सध्या रोहित 36 वर्षांचा आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 243 सामने खेळले आहेत आणि 9825 धावा केल्या आहेत. यात एकूण 30 शतके आणि 48 अर्धशतके आहेत. 264 ही त्याची वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये रोहितने आतापर्यंत 148 आंतरराषअट्रीय सामने खेळले आहेत आणि 3853 धावा केल्या आहेत. यात 4 शतक आणि 29 अर्धशतके त्याच्या बॅटमधून निघाली. 118 ही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम खेळी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळलेल्या 50 सामन्यांमध्ये 9 शतक आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने रोहितने 3437 धावा केल्या आहेत. 212 ही कसोटीतील रोहितची सर्वोत्तम खेळी आहे.
नुकत्याच वार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. रोहित शर्मासाठी ही एखाद्या आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यायत नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ होती. तो कपिल देव आणि एमएस धोनीनंतर भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा तिसरा कर्णधार डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात ठरू शकत होता. पण असे होऊ शकले नाही. भारतीय संघ या सामन्यात 209 धावांनी पराभूत झाला. असे असले तरी आगामी वनडे विश्वचषकात देखील रोहित ही कामगिरी करू शकतो. यावर्षी होणारा विश्वचषक भारतात आयोजित केला जाणार आसून रोहितच्या नेतृत्वाती भारतीय संघाला घरच्या परिस्थितीचा फायदा मिळेल. (16 Years of Rohit Sharma’s International Career)
महत्वाच्या बातम्या –
‘देव आपल्याला वाचवणार नाही म्हणत,’ धोनीने खेळाडूंना केले प्रोत्साहित; मग काय भारत बनला चॅम्पियन
MPL 2023: पुणेरी बाप्पाची सलग दुसरी हार! विजयासह सोलापूर रॉयल्सचे आव्हान कायम