टी२० विश्वचषकात भारतीय संघाने त्यांचा शेवटचा सामना सोमवारी (८ नोव्हेंबर) खेळला. या सामन्यात भारतासमोर नामिबियाचे आव्हान होते. सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात देत तुफान फटकेबाजी केली. सलामीवीर रोहित शर्माने ३१ चेंडूत त्याचे अर्थशतक पूर्ण केले. रोहितने या सामन्यात संघासाठी महत्वाची खेळी तर केलीच, पण त्याच्या स्वत:च्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंदही केली आहे.
रोहित शर्माने नामिबियाविरुद्ध महत्वाची खेळी केली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील ३००० धावांचा टप्पा गाठला आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी ३००० पेक्षा जास्त धावा करणारा रोहित दुसरा खेळाडू ठरला आहे. रोहितपूर्वी विराट कोहलीन ही कामगिरी केली आहे. तसेच जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टीलने देखील आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
रोहितने या सामन्यात केलेल्या खेळीनंतर तो केवळ टी२० मध्येच नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये (कसोटी, एकदिवसीय, टी२०) प्रत्येकी ३००० धावा पूर्ण करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. कर्णधार विराटनेही यापूर्वी कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तीनही प्रकारांमध्ये प्रत्येकी ३००० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने एकूण ३७ चेंडूत ५६ धावा केल्या आणि डावाच्या १० व्या षटकात तो बाद झाला. त्याने केलेल्या या धावांमध्ये त्याच्या सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली. नामिबियाच्या जान फ्रायलिंकने रोहित शर्माची महत्वाची विकेट घेतली.
पण, रोहित आणि केएल राहुलने (५४*) यांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताने हा सामना ९ विकेट्सने जिंकला.
दरम्यान, सामन्यात नामिबियाने प्रथम फलंदीज करत २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १३२ धावा केल्या. यामध्ये डेविड विजेने २५ चेंडूत सर्वाधिक २६ धावा केल्या. तसेच स्टिफन ब्रॅडने २१ चेंडूत २१ धावे केल्या होत्या. भारताच्या रविचंद्रन अश्विनने २० आणि रविंद्र जडेजाने १६ धावा देऊन प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आणि नामिबियाला जास्त धावा करण्यापासून रोखले. याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराहनेही १९ धावा देऊन २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅचमास्टर! नामिबियाविरुद्ध ३ झेल घेत रोहितने ‘या’ यादीत विराट, रैनाला पछाडत पटकावला अव्वल क्रमांक
“भारतीय क्रिकेटची अवस्था तशीच आहे, जशी इंग्लंडची फुटबॉलमध्ये”





