रविवारी (११ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात आयपीएलच्या तेराव्या हंगामातील २७वा सामना झाला. हिटमॅन रोहित शर्माचा हा आयपीएलमध्ये मुंबई संघाकडून खेळलेला १५०वा सामना होता.
यासह रोहित हा आयपीएल इतिहासात एका संघाकडून सर्वाधिक सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सहभागी झाला आहे. तसेच त्याने मुंबईकडून १५० सामने खेळण्याचा पराक्रम केल्यामुळे, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि समालोचक झहीर खानच्या हातून त्याला नवी जर्सीदेखील देण्यात आली.
रोहितपुर्वी विराट कोहलीने आयपीएलमध्ये एका संघाकडून सर्वाधिक सामने करण्याचा विक्रम केला होता. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगोलरकडून १८३ सामने खेळत या यादीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. तसेच एमएस धोनी, सुरेश रैना, कायरन पोलार्ड यांनीही हा विक्रम केला आहे.
२००८पासून आयपीएलचा भाग असलेल्या रोहितने २०११ साली मुंबई इंडियन्स संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून तो मुंबईचाच भाग आहे. आतापर्यंत रोहितने आयपीएलमध्ये मुंबईकडून १५० सामने खेळत ३९३९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १ शतक आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलच्या एका संघाकडून सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
विराट कोहली- बेंगलोर, १८३ सामने
एमएस धोनी- चेन्नई, १६६ सामने
सुरेश रैना- चेन्नई, १६३ सामने
कायरन पोलार्ड- मुंबई, १५५ सामने
रोहित शर्मा- मुंबई, १५० सामने
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर मुंबई विरुद्ध मुंबईकर अजिंक्य रहाणेला मिळाली संधी; पाहा असा आहे ११ जणांचा दिल्ली संघ
बेंगलोरविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर ‘या’ माजी क्रिकेटरचा रायडूवर चढला पारा, म्हणाला…
धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ; माथेफिरूने दिली होती धमकी
ट्रेंडिंग लेख-
‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज
फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा
आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ