---Advertisement---

धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ; माथेफिरूने दिली होती धमकी

On: रविवार, ऑक्टोबर 11, 2020 7:19 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या रांची येथील फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ केली आहे. धोनीची मुलगी झिवा धोनीला सोशल मीडियावर मिळालेल्या बलात्काराच्या धमकीनंतर रांची पोलिसांनी फार्म हाऊसच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

खरं तर आयपीएल २०२० मध्ये सातत्याने पराभवाचा सामना करत असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीला ही धमकी मिळाली होती. एका माथेफिरू व्यक्तीने धोनीच्या मुलीबद्दल अशाप्रकारचे वक्तव्य केले होते. रांची पोलिसांनी गुन्हा नोंदवून धोनीच्या घराची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

अशाप्रकारच्या वक्तव्यानंतर क्रीडा, सिनेसृष्टी तसेच संपूर्ण देशभरातून आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे. अभिनेत्री नगमानेही या वक्तव्याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात काय चाललंय?, असा प्रश्न विचारला आहे.

नगमाने सोशल मीडियावर पुढे लिहिले की, “एक देश म्हणून आपण कुठे उभे आहोत? ही खूप लज्जास्पद बाब आहे की, आयपीएलमध्ये कोलकाताकडून पराभव मिळाल्यानंतर लोकांनी धोनीच्या ५ वर्षीय मुलीला धमकी दिली.”

चेन्नई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. त्यात त्यांना केवळ २ सामन्यात विजय, तर ५ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंत आयपीएलचे ३ विजेतेपद (२०१०, २०११ आणि २०१८) जिंकले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-“माझी तुलना तीही रोहित शर्माशी…”, युवा पाकिस्तानी क्रिकेटरने केले मोठे वक्तव्य

-विराटने धोनीची घेतलेली गळाभेट पाहून चाहत्यांनाही झाला आनंद, पाहा व्हिडिओ

-आला रे! हैदाराबादविरुद्धच्या सामन्यातून राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे पुनरागमन 

ट्रेंडिंग लेख-

-‘नरेल एक्सप्रेस’ : तब्बल १५ शस्त्रक्रिया होऊनही फलंदाजावर आग गोळे फेकणारा अवलिया गोलंदाज

-फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा

-आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---