भारतीय क्रिकेट संघाने नवीन वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका जिंकून केली. यानंतर आता भारतीय संघापुढे न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंड संघदेखील 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला असून, वनडे मालिकेने दौऱ्याला सुरुवात होईल. वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (18 जानेवारी) हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळला जाईल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनविषयी संकेत दिले.
मालिकेच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने या मालिकेत ईशान किशन याला संधी देण्यात येईल हे जाहीर केले. रोहित म्हणाला,
“ईशान या मालिकेसाठी संघात असेल. तो यष्टीरक्षण आणि मधल्या फळीत फलंदाजी करेल. यशस्वी बांगलादेश दौऱ्यानंतर त्याला आता पुन्हा संधी मिळत आहे.”
ईशान याने बांगलादेशविरुद्धच्या वनडे सामन्यात द्विशतक झळकावले होते. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत ईशानला बाकावर बसावे लागलेले. त्यानंतर संघ व्यवस्थापनावर मोठी टीका झालेली. त्या मालिकेत केएल राहुल संघाचा भाग होता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत राहुल वैयक्तिक कारणाने सहभागी होणार नाही. त्यामुळे ईशान यष्टीरक्षण तसेच पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. त्यासोबतच चौथ्या क्रमांकावरील प्रमुख फलंदाज श्रेयस हा देखील दुखापतीमुळे मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव याला संधी मिळेल.
हैदराबाद वनडेसाठी भारताचा संभाव्य संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमरान मलिक व मोहम्मद सिराज.
(Rohit Sharma Confirms Ishan Kishan Will Play As Wicketkeeper Against Newzealand)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव स्मिथचे वादळी शतक, विक्रम मोडणे विराट कोहलीसाठीही अशक्य
टीम इंडियाच्या माजी कर्णधारावर गुन्हा दाखल; महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्याशी संबंध