भारतीय संघ आयपीएल 2020 चा हंगाम संपला की लगेचच 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. मात्र या दौऱ्यातील कोणत्याच मालिकेसाठी रोहित शर्माचा भारतीय संघात दुखापतीमुळे समावेश करण्यात आला नव्हता. पण तो दुखापतीतून पुनरागमन करत मुंबई इंडियन्सकडून 2 सामने खेळला असल्याने त्याच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.
याबद्दल इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगितले की ‘याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. रोहित संघाबरोबर असणे योग्य ठरेल, जेणेकरुन फिजिओ नितीन पटेल आणि ट्रेनर निक वेबबरोबर त्याला त्याच्या ताकदीवर काम करता येईल.”
त्यामुळे जर रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गेला तर त्याला वनडे मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते. तसेच त्यानंतर तो टी20 मालिकेतून पुनरागमन करु शकतो. वनडे आणि टी20 मालिकेनंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळणार आहे. तोपर्यंत रोहित पूर्णपणे फिट होण्याची अपेक्षा सर्वांना असेल.
ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर भारतीय संघाला आधी 14 दिवस क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. तर टी20 मालिका 4 डिसेंबरपासून सुरु होईल. यानंतर 17 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरु होणार आहे.
विराट ऐवजी खेळू शकतो रोहित –
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान विराट वडील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो कदाचीत एक किंवा दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर असे झाले तर कदाचीत त्याच्याऐवजी रोहितला संधी दिली जाऊ शकते.
आयपीएलदरम्यान रोहित झाला होता दुखापतग्रस्त –
आयपीएल 2020 दरम्यान किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो मुंबईकडून 4 सामने खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्याने मुंबईकडून साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यातून पुनरागमन केले. तसेच तो क्वालिफायर 1 चा सामना देखील खेळला. याद्वारे त्याने तो फिट असल्याचे सांगितले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ पाच खेळाडूंची आरसीबीतून होऊ शकते हकालपट्टी, एक नाव आहे धक्कादायक
कहर! आयपीएल २०२०मध्ये ‘त्याची’ एक धाव संघाला पडली तब्बल १० लाखांना
‘हा’ खेळाडू भारताला एकहाती सामना जिंकून देणार, गांगुलीने व्यक्त केला विश्वास
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटर असलेल्या पोराला दुखापत झाली म्हणून अल्पभूधारक शेतकरी बापाने विकली होती जमीन
‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ टाकणारा ‘तो’ जितक्या वेगाने प्रसिद्ध झाला तितक्याच वेगाने क्रिकेटमधून गायब झाला