---Advertisement---

रोहित शर्मा बनेल सचिन तेंडुलकरपेक्षाही मोठा सलामीवीर, शतकांचा हा विक्रम मोडून रचेल इतिहास!

Rohit Sharma (1)
---Advertisement---

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या काही काळापासून शानदार फलंदाजी करत असलेल्या रोहितनं आणखी तीन शतकं झळकावली, तर तो भारताचा सर्वात महान सलामीवीर फलंदाज बनेल. या बाबतीत तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो.

वास्तविक, रोहित शर्माकडे भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकं झळकावण्याची संधी आहे. या बाबतीत सचिन तेंडुलकर अजूनही अव्वल स्थानी आहे. रोहित शर्मानं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून 43 शतकं झळकावली आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. ओपनिंग करताना सचिननं कारकिर्दीत 45 शतके झळकावली. त्याचा हा विक्रम मोडून रोहित भारताचा महान सलामीवीर बनू शकतो. यासाठी रोहितला फक्त तीन शतकांची आवश्यकता आहे. रोहित शर्माचा अलीकडचा फॉर्म पाहता असं करणं त्याच्यासाठी मोठी गोष्ट नसेल.

सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मानंतर भारतासाठी सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवागनं सर्वाधिक शतकं ठोकली आहेत. ओपनिंग करताना सेहवागनं कारकिर्दीत एकूण 36 शतकं झळकावली होती. चौथ्या क्रमांकावर लिटिल मास्टर सुनील गावस्कर आहेत. गावस्कर यांनी ओपनिंग करताना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 34 शतकं झळकावली.

‘गब्बर’ या नावानं ओळखला जाणार शिखर धवन या लिस्टमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. धवननं सलामी करताना 24 शतकं झळकावली आहेत. मात्र 2022 पासून त्याला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.

सलामीला सर्वाधिक शतकं ठोकणारे फलंदाज

डेव्हिड वॉर्नर – 49
सचिन तेंडुलकर – 45
रोहित शर्मा – 43 शतके
ख्रिस गेल – 42
सनथ जयसूर्या – 41
मॅथ्यू हेडन – 40
ग्रॅम स्मिथ – 37
वीरेंद्र सेहवाग – 36
डेसमंड हेन्स – 35
सुनील गावस्कर – 35

हेही वाचा – 

चेतेश्वर पुजारासोबत हे काय घडतंय! भारतीय संघापाठोपाठ या विदेशी संघानंही दाखवला बाहेरचा रस्ता
भारताच्या माजी खेळाडूच्या मुलाला मिळाली इंग्लंडकडून खेळण्याची संधी, श्रीलंकेविरुद्ध उतरला मैदानात
क्रिकेटमध्ये भारतीयांचा दबदबा! ऑस्ट्रेलियन संघात 3 भारतीय वंशाच्या खेळाडूंची एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---