वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक लढत शनिवारी (14 ऑक्टोबर) चाहत्यांना पाहायला मिळाली. कर्णधार रोहित शर्मा याच्या वादळी खेळीमुळे भारताने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. रोहितने या सामन्यात 86 धावांची वादळी खेळी केली. आपल्या या खेळी दरम्यान रोहित ने तब्बल 11 नवीन विक्रम बनवले.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना रोहितने 63 चेंडूंमध्ये 86 धावा कुटल्या. यामध्ये सहा चौकार आणि सहा षटकार सामील होते. रोहितने या खेळी दरम्यान लहान मोठे असे अकरा पराक्रम केले.
आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये 300 षटकार मारणारा रोहित पहिला भारतीय बनला. अशी कामगिरी करताना त्याने सर्वात कमी डाव खेळले. धावांचा पाठलाग करताना वनडे विश्वचषकात त्याने सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम ही आपल्या नावे केला. तसेच धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावांची खेळी त्याने करून दाखवली.
याबरोबरच रोहित एका वर्षात 60 षटकार मारणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. विश्वचषक इतिहासात सर्वाधिक सरासरी राखणाऱ्या खेळाडूंमध्ये देखील तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. विश्वचषकात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला. तसेच वनडे क्रिकेटमध्ये पन्नासाव्या वेळी त्याने धावांचा पाठलाग करताना 50 धावांची खेळी केली. भारतीय कर्णधार म्हणून पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम देखील त्याच्याच नावे नोंद झाला. तसेच पाकिस्तानविरुद्ध भारतीय कर्णधाराकडून एका डावात केली गेलेली ही सर्वोच्च खेळी ठरली. तसेच आयसीसी स्पर्धेच्या सामन्यात एका डावात पाच किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकण्याची हे रोहितची चौथी वेळ होती.
(Rohit Sharma Create 11 New Records Against Pakistan In ODI)
महत्वाच्या बातम्या –
सिक्स हिटिंग मशिन शर्मा जी! तुफानी अर्धशतकासह वनडेत ठोकली षटकारांची ‘ट्रिपल सेंच्युरी’
इंग्लंड सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील, अफगाणिस्तानचे पहिल्या विजयावर लक्ष