Rohit Sharma Record: हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आता रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. यामध्ये त्याने माजी कर्णधार सौरव गांगुली याला मागे टाकले आहे.
इंग्लंडविरुद्ध सामन्याच्या पहिल्या डावात रोहितने 27 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या होत्या, ज्याच्या मदतीने तो सौरव गांगुलीला मागे टाकण्यात यशस्वी ठरला होता. गांगुलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 18433 धावा केल्या होत्या. हिटमॅन म्हटल्या जाणाऱ्या रोहित शर्माने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 18444 धावा पूर्ण केल्या आहेत.रोहितने 490 डावात 18444 धावा केल्या आहेत. तर दादा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सौरव गांगुलीने 485 डावात 18433 धावा केल्या होत्या.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे, ज्याने 664 सामन्यांच्या 782 डावांमध्ये 34357 धावा केल्या आहेत. या यादीत दुसरे नाव फलंदाज विराट कोहली याचे आहे, ज्याने 26733 धावा केल्या आहेत. याशिवाय माजी खेळाडू आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड 24064 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत रोहित शर्मा चौथ्या तर सौरव गांगुली पाचव्या स्थानावर आहे.
2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या रोहित शर्माने आतापर्यंत 55 कसोटी, 262 वनडे आणि 151 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
कसोटीच्या 93 डावांमध्ये त्याने 45.33 च्या सरासरीने 3762 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 10 शतके आणि 16 अर्धशतके केली आहेत. याशिवाय हिटमॅनने वनडेच्या 254 डावांमध्ये 49.12 च्या सरासरीने 10709 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 31 शतके आणि 55 अर्धशतके केली आहेत. तर 143 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रोहित शर्माने 31.29 च्या सरासरीने आणि 139.98 च्या स्ट्राइक रेटने 3974 धावा केल्या आहेत. (Rohit Sharma created history becoming the fourth player to do so for India)
हेही वाचा
मॅच फिक्सिंगच्या आरोपांवर शोएब मलिकने सोडले मौन, संघ सोडून दुबईला जाण्याचे सांगितले मुख्य कारण
हजारो कोटींच्या मालकाने मुलांना प्रेरीत करण्यासाठी दिले विराट कोहलीचे उदाहरण, पाहा व्हायरल व्हिडिओ