पाच वेळा इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा किताब जिंकणारा संघ म्हणजे मुंबई इंडियन्स होय. मुंबई संघ आयपीएल 2023 स्पर्धेत शानदार कामगिरी करताना दिसत आहे. मात्र, संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा मागील चार सामन्यांपासून दोन आकडी धावांसाठी संघर्ष करत आहे. मुंबई संघ हंगामातील 10वा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअमवर चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध खेळण्यासाठी उतरला होता. यावेळीही रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही, आणि त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
चेन्नई विरुद्ध मुंबई (Chennai vs Mumbai) संघ आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील 49वा सामन्यात आमने-सामने होते. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी मुंबई इंडियन्स संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी कॅमरून ग्रीन आणि ईशान किशन आले. मुंबईला पहिला धक्का दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ग्रीनच्या रूपात बसला. यानंतर मुंबईचा डाव सावरण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) फलंदाजीला आला. मात्र, खेळपट्टीवर असलेला ईशानही तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दीपक चाहर (Deepak Chahar) याच्या गोलंदाजीवर महीश थीक्षणाच्या हातून वैयक्तिक 7 धावांवर झेलबाद झाला. दोन विकेट्स पडल्यानंतर यावेळी संघाला रोहितकडून भरपूर अपेक्षा होती. मात्र, तो या अपेक्षांवर खरा उतरला नाही.
रोहितने यावेळी फक्त 3 चेंडूंचा सामना केला. यावेळी त्याला एकही धाव काढता आली नाही. रोहितही चाहरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजा याच्या हातून झेलबाद झाला. रोहित शून्यावर बाद होण्याची ही सलग दुसरी वेळ होती. मागील सामन्यात पंजाब किंग्सविरुद्धही खेळताना रोहित 3 चेंडू खेळून शून्यावर झेलबाद झाला होता. आता चेन्नईविरुद्ध शून्यावर बाद होताच त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली.
No prizes on guessing which team is on 🔝 at the moment 😎😎
Follow the match ▶️ https://t.co/hpXamvn55U #TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/fuQnl7Uc9L
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित अव्वलस्थानी विराजमान झाला. आयपीएलमध्ये रोहित शर्मा 16वेळा शून्यावर बाद (Rohit Sharma Duck for 16 times in IPL) झाला. रोहितपाठोपाठ या यादीत दुसऱ्या स्थानी संयुक्तरीत्या दिनेश कार्तिक, सुनील नारायण आणि मनदीप सिंग हे खेळाडू आहेत. हे तिघेही 15 वेळा शून्यावर बाद झाले होते. तसेच, यादीतील अखेरचे नाव अंबाती रायुडू याचे आहे. रायुडू आयपीएलमध्ये 14 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे खेळाडू
16 – रोहित शर्मा*
15 – दिनेश कार्तिक
15 – सुनील नारायण
15 – मनदीप सिंग
14 – अंबाती रायुडू
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023च्या 50व्या सामन्यापूर्वीच दिल्लीबाबत धक्कादायक ब्रेकिंग! ‘हा’ हुकमी एक्का परतला मायदेशी
चेपॉकच्या महायुद्धात नाणेफेक धोनीच्या बाजूने! मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण, तिलक बाहेर