भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तत्काळ निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट जगताला चकित केले. अनिल कुंबळे (619 विकेट) नंतर अश्विनने भारतासाठी सर्वाधिक 537 विकेट घेतल्या आहेत. ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आर. अश्विन कर्णधार रोहित शर्मासोबत पत्रकार परिषदेत पोहोचला. एक खेळाडू म्हणून हा निर्णय त्याच्यासाठी किती कठीण होता हे त्याच्याकडे पाहताच स्पष्टपणे दिसून येत होते.
RAVI ASHWIN ANNOUNCES HIS RETIREMENT.
– An emotional speech by Ash. 🥹❤️pic.twitter.com/ZkVoKVD0m0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2024
कर्णधार रोहित शर्मासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना अश्विन म्हणाला, “मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. भारतीय संघाचा क्रिकेटपटू म्हणून हा माझा शेवटचा दिवस आहे. यानंतर त्याने कोणतेही प्रश्न विचारण्यास नकार दिला आणि घोषणा करून निघून गेला. 38 वर्षीय अश्विनने ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या गुलाबी चेंडूची कसोटी खेळताना एक विकेट घेतली होती.
अश्विनच्या पत्रकार परिषदेतून बाहेर पडल्यानंतर रोहित म्हणाला, “मी जेव्हा पर्थला आलो, तेव्हा मला अश्विनच्या निवृत्तीबद्दल कळालं होतं. मी त्याला पिंक बॉल कसोटी खेळण्यास राजी केलं. तो भारताचा खरा मॅचविनर खेळाडू आहे. त्याला त्याच्या निर्णयावर खूप विश्वास आहे. आपण त्याच्या इच्छेचा आदर केला पाहिजे.” निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी तो ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीसोबत भावूक होताना दिसला. बीसीसीआयने अश्विनच्या निर्णयावर पोस्ट करत ट्विटरवर लिहिले की, “अश्विन कौशल्य, प्रतिभा आणि नाविन्य यांचा समानार्थी शब्द आहे.”
KOHLI 🙇 ASHWIN…!!!!
– Two greats of Indian cricket hugging during Gabba Test. pic.twitter.com/dPHL5PgBuV
— Johns. (@CricCrazyJohns) December 18, 2024
हेही वाचा-
अश्विनच्या निवृत्तीवर माजी क्रिकेटपटूंनी आश्चर्य व्यक्त केलं, गंभीर-रोहित जोडीवर प्रश्न उपस्थित
IND vs AUS; चौथ्या कसोटीत नाही खेळणार ट्रेविस हेड? दुखापतीबद्दल म्हणाला…
भारताचा फिरकीचा जादुगार रविचंद्रन अश्विनची संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द…!