चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ‘हिटमॅन’ रोहित शर्मानं शानदार शतक झळकावलं. रोहितनं 63 चेंडूत नाबाद 105 धावा केल्या. या खेळीत त्यानं 11 चौकार आणि 5 षटकार मारले. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला विजयापर्यंत नेऊ शकला नाही, मात्र आता तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे.
आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत आरसीबीचा विराट कोहली 6 सामन्यात 319 धावांसह अव्वल स्थानावर आहे. यानंतर राजस्थानचा रियान पराग 6 सामन्यात 284 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन 6 सामन्यांत 264 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा 6 सामन्यात 261 धावांसह चौथ्या स्थानावर पोहचला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलच्या नावावर 6 सामन्यात 255 धावा आहेत. तो पाचव्या स्थानावर आहे.
पर्पल कॅपच्या शर्यतीबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या लिस्टमध्ये आघाडीवर आहे. त्याच्या नावावर 6 सामन्यात 11 विकेट आहेत. तर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 6 सामन्यांत 10 विकेट्स घेऊन दुसऱ्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा मुस्तफिजुर रहमान 5 सामन्यात 10 विकेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर पंजाब किंग्जच्या कागिसो रबाडानं 6 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. कागिसो रबाडा पर्पल कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचा खलील अहमद, पंजाब किंग्जचा अर्शदीप सिंग आणि मुंबई इंडियन्सचा गेराल्ड कोएत्झी यांच्या नावावर समान 9-9 विकेट आहेत.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (ऑरेंज कॅप)
विराट कोहली – 319 धावा (बंगळुरू)
रियान पराग – 284 धावा (राजस्थान)
संजू सॅमसन – 264 धावा (राजस्थान)
रोहित शर्मा – 261 धावा (मुंबई)
शुबमन गिल – 255 धावा (गुजरात)
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज (पर्पल कॅप)
युजवेंद्र चहल – 11 बळी (राजस्थान)
जसप्रीत बुमराह – 10 बळी (मुंबई)
मुस्तफिजुर रहमान – 10 बळी (चेन्नई)
कागिसो रबाडा – 9 बळी (पंजाब)
खलील अहमद – 9 बळी (दिल्ली)
महत्त्वाच्या बातम्या –
“हार्दिक पांड्याचं नेतृत्व अन् गोलंदाजी दोन्ही अगदी सामान्य”, सुनील गावसकरांची जोरदार टीका
“तो पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नाही”, हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर गिलख्रिस्टनं उपस्थित केले प्रश्न