मुंबई। आज (29 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात सुरु असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रमाची बरोबरी केली आहे.
या सामन्यात केमार रोच गोलंदाजी करत असताना पाचव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहितने मिड विकेटवरुन षटकार मारला. या षटकाराबरोबरच रोहितने सचिनच्या वनडे क्रिकेटमधील 195 षटकारांची बरोबरी केली आहे.
त्यामुळे वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित सचिनसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याचबरोबर या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने आत्तापर्यंत 331 वनडे सामन्यात 218 षटकार मारले आहेत. तसेच तो वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. त्याने 398 सामन्यात 351 षटकार मारले आहेत. या यादीत रोहित सचिनसह सातव्या क्रमांकावर आला आहे.
रोहितने हा विक्रम त्याच्या 192 व्या सामन्यात केला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज-
218 – एमएस धोनी
195 – सचिन तेंडुलकर / रोहित शर्मा
190 – सौरव गांगुली
155 – युवराज सिंग
हिटमॅन रोहित शर्माने केली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी #म #मराठी #India #TeamIndia #RohitSharma #IndvWi pic.twitter.com/2QeHt8lP6Q
— Maha Sports (@Maha_Sports) October 29, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–७ वर्षांपुर्वीचा तेंडुलकर-सेहवागचा विक्रम हिटमॅन- गब्बरने मोडला
–ब्रेबॉर्नवर होणाऱ्या ऐतिहासिक वनडेसाठी अशी आहे टीम इंडिया
–ISL 2018: जमशेदपूरचे प्रशिक्षक फरांडो यांच्यासाठी आता प्रत्येक लढत म्हणजे फायनलच