---Advertisement---

कधी सुधारणार रोहित शर्मा! मोहाली कसोटीत छोटीशी चूक करत फक्त २९ धावांवर झाला बाद

Rohit-Sharma-Wicket
---Advertisement---

भारताचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) खूप चांगला पुलर आहे. बऱ्याचदा त्याच्या बॅटमधून निघणारे पुल शॉट किंवा हुक शॉट पाहण्यासारखे असतात. परंतु कधी-कधी त्याची हिच ताकद त्याची कमजोरी बनताना दिसली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात शुक्रवारपासून (०४ मार्च) मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर पहिला कसोटी (Mohali Test) सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान रोहितने हीच चूक केली आणि तो स्वस्तात आपली (Rohit Sharma Out On Short Ball) विकेट गमावून बसला. 

त्याचे झाले असे की, या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहितने प्रथम फलंदाजी निवडली होती. त्यामुळे भारताकडून रोहित आणि मयंक अगरवालची जोडी सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरली होती. रोहित आणि मयंकच्या जोडीने जलद सुरुवात करत १० षटकांमध्येच ५० हून जास्त धावा फलकावर लावल्या होत्या. परंतु श्रीलंकेच्या संघाने लवकरच ही जोडी फोडली.

डावातील १० वे षटक टाकण्यासाठी श्रीलंकेचा लहिरू कुमारा आला होता. त्याने त्याच्या षटकातील सुरुवातीचे ३-४ चेंडू शॉर्ट पिच चेंडू फेकले. अशाच षटकातील पाचव्या शॉर्ट पिच चेंडूवर रोहित फसला. तो चेंडू त्याच्या शरीराच्या जवळून आला होता, त्यामुळे त्याला हात सोडून खेळला आले नाही. परिणामी त्याने मारलेला चेंडू हवेतून उंचावरून कमी अंतरावर गेला आणि लाँग लेगवर उभा असलेल्या सुरंगा लकमलने अतिशय सोपा झेल घेत रोहितला बाद केले. तो केवळ २८ चेंडूंमध्ये २९ धावा करून झेलबाद झाला.

रोहित पुल शॉट आणि हुक शॉट खेळण्यात माहीर आहे. परंतु बऱ्याचदा या शॉटमुळे त्याने स्वत:ची विकेटही गमावली आहे. ईएसपीएनक्रिकइंफोच्या आकडेवारीनुसार, रोहित २०१८ मध्ये २० पैकी ७ वेळा पुल किंवा हुक शॉट खेळताना बाद झाला आहे. असे असले तरीही त्याने या शॉट्सच्या मदतीने २२३ च्या स्ट्राईक रेटने कसोटीत १९२ धावाही केल्या आहेत. तो जेव्हा पुल किंवा हुक शॉट खेळत नसतो, तेव्हा त्याची फलंदाजी सरासरी ६० च्या जवळपास असते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘टेस्ट कॅप्टन’ बनताच ‘हिटमॅन’ ठरला ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेव क्रिकेटपटू

विराटसह अश्विनसाठीही संस्मरणीय मोहाली कसोटी! दिग्गजांच्या पंक्तीत झाला सामील

कसोटी कारकिर्दीतील ‘ती’ गोष्ट विराट कोहलीसाठी सर्वात खास, स्वतःच केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---