भारतातील क्रिकेट चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना भेटण्यासाठी कोणतीही मर्यादा ओलांडू शकतात. आता आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यापूर्वी अशीच एक घटना समोर आली आहे. रोहित शर्माची विनोदी शैली त्याला चाहत्यांमध्ये फार लोकप्रिय बनवते. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये, एक महिला चाहती चक्क रोहितच्या पायाला स्पर्श करताना दिसते.
झालं असं की, वानखेडे स्टेडियमवर एक महिला चाहती रोहित शर्माकडे आली आणि तिनं रोहितच्या पायाला स्पर्श केल्यानंतर त्याचा ऑटोग्राफ मागितला. रोहितनंही महिलेला निराश न करता तिच्यासोबत फोटो क्लिक करून तिचा दिवस संस्मरणीय बनवला.
A fan meets Rohit Sharma & touches his feet at the Wankhede stadium. 💥 pic.twitter.com/LsWwFUCbRg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 6, 2024
आयपीएल 2024 मध्ये रोहित शर्मा त्याच्या चाहत्यांमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यातही एका चाहता रोहितला भेटण्यासाठी मैदानावर धावत आला होता. याच सामन्यात प्रेक्षकांनी ‘मुंबईचा राजा, रोहित शर्मा’ अशा घोषणाही दिल्या होत्या.
रोहितचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, जेव्हा रोहित शर्माला काढून हार्दिक पांड्याकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं, तेव्हा काही तासांतच मुंबई इंडियन्सनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स गमावले. याशिवाय मुंबईच्या सामन्यांदरम्यान हार्दिकच्या विरोधात अनेकदा घोषणाबाजीही करण्यात आली आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या नेहमीच्या शेलीत दिसला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. मात्र दिल्लीविरुद्ध त्यानं सगळी कसर भरून काढली. रोहितनं पहिल्या चेंडूपासूनच आक्रमणाला सुरुवात केली. दुर्दैवानं, त्याचं अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकलं, मात्र मुंबईला तुफानी सुरुवात करून दिली. रोहित 27 चेंडूत 49 धावा करून बाद झाला. या दरम्यान त्यानं 6 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार ठोकले.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तेरे जैसा यार कहां…’, वानखेडेवर पुन्हा भेटले सचिन-सौरव; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल
मुंबईविरुद्ध दिल्लीनं टॉस जिंकला, सूर्याचं पुनरागमन; जाणून घ्या प्लेइंग 11
देशासाठी खेळताना हिरो, आयपीएलमध्ये मात्र झिरो! ग्लेन मॅक्सवेलला झालंय तरी काय?