गुरुवारपासून (5 ऑक्टोबर) भारतात वनडे क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेत यावेळी दहा संघ सहभागी झाले आहेत. तब्बल दीड महिने चालणाऱ्या या स्पर्धेत कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. स्पर्धेचा यजमान भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. असे असले तरी भारताच्या विजयाची प्रार्थना सर्व चाहते करताना दिसत आहेत. बारा वर्षानंतर भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी काही चाहते आता वेगवेगळे उपक्रम करताना दिसतायेत.
https://www.instagram.com/reel/CyBFpbYsEGe/?igshid=MTc4MmM1YmI2Ng==
भारतीय संघाने आपला अखेरचा विश्वचषक 2011 मध्ये जिंकला होता. त्यानंतर सलग दोन विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागले. यावेळी भारताने विश्वचषक जिंकावा यासाठी पुण्यातील काही चाहत्यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला. भारतीय कर्णधार रोहित शर्माचे चाहते असलेल्या या चाहत्यांनी पुण्यात गुरुवारी गरजूंना अन्न वाटप केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताच्या विजयाच्या आशेने या खेळाडूंनी पुण्यातील नवले ब्रिज, कात्रज बाग, राजारामपुरी या ठिकाणी शोभेच्या वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना तसेच इतर गरजूंना अल्पपहार वाटप केला.
या विश्वचषकात भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून भारतीय संघाला आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत असून, उपकर्णधार हार्दिक पंड्या असेल.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
(Rohit Sharma Fans Distribute Foods In Pune For Praying India World Cup Win)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपचं पहिलं अर्धशतक रुटच्या नावावर, एकट्याने फोडून काढली न्यूझीलंडची गोलंदाजी
‘काय राव हे…?’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाकिस्तानी कर्णधार बाबरही झाला लोटपोट