आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (10 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला जात आहे. कोलंबो येथे खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित करण्यात आले. भारतीय संघासाठी कर्णधार रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी वेगवान सुरुवात दिली. शानदार अर्धशतक केलेल्या रोहितने आपल्या खेळी दरम्यान पाकिस्तानचा उपकर्णधार व फिरकीपटू शादाब खान याच्यावर विशेष हल्ला चढवला.
भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर पहिल्या पाच चेंडूंवर रोहित एकही धाव काढू शकला नव्हता. मात्र त्यांनी तर त्याने सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर गिल आक्रमकपणे खेळत असल्याने त्याने सावध पवित्रा घेतला. मात्र, फिरकीपटू शादाब खान गोलंदाजीला आल्यावर त्याने त्याच्यावर हल्ला चढवला. रोहितने त्याच्या गोलंदाजीवर तीन षटकार व दोन चौकार ठोकले. शादाबने आपल्या पहिल्या दोन षटकात तब्बल 31 धावा खर्च केल्या. अखेर त्यानेच रोहितला 56 धावांवर बाद केले.
आजवर रोहित व शादाब हे 5 सामन्यांमध्ये आमने-सामने आले आहेत. यादरम्यान त्याने शादाबच्या 87 चेंडूंचा सामना केला असून यामध्ये 117 धावा काढल्या आहेत. तर शादाब देखील त्याला दोन वेळा बाद करण्यात यशस्वी ठरला आहे. यामध्ये सहा चौकार व सात षटकारांचा समावेश आहे. तर सरासरी ही 58.50 इतकी जबरदस्त दिसून येते. यासोबतच स्ट्राईक रेट देखील 134 पेक्षा जास्त आहे.
या सामन्यात भारतीय संघासाठी सुरुवात चांगली झाली रोहित व गिल यांनी अवघ्या 13.2 षटकात भारताला 100 धावा दिल्या. दोघांनी 121 धावांची सलामी दिल्यानंतर आधी रोहित व नंतर गिल तंबूत परतला. रोहित ने 56 तर गिलने 58 धावांचे योगदान दिले. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने 24.1 षटकात 147 धावा केल्या होत्या. विराट व केएल राहुल हे मैदानावर नाबाद होते.
(Rohit Sharma Fantastic Record Against Shadab Khan)
हेही वाचाच-
भारताविरुद्ध भिडण्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! वनडेतील बादशाहत संपुष्टात, ऑस्ट्रेलिया पुन्हा नंबर 1
IND vs PAK सामन्यापूर्वी रोहितसेनेला अख्तरची चेतावणी; व्हिडिओमुळे सोशल मीडियावर खळबळ