भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने आयपीएल २०२० चा हंगाम संपल्यानंतर लगेचच युएईवरुन भारतीय संघासह ऑस्ट्रेलियाला न जाता थेट मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला होता. त्याने हा निर्णय का घेतला यावरुन चर्चाही झाली होती. परंतु आता असे वृत्त समोर येत आहे की रोहितचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्याने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला होता.
याबद्दल क्रीडा पत्रकार बोरीया मुजुमदार यांनी माहिती दिली आहे.
रोहित अगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील मर्यादीत षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग नसला तरी तो कसोटी संघात आहे. पण सध्या रोहित बंगळुरु येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीवर काम करत आहे. तसेच ऑस्ट्रेलियात पोहचल्यानंतर १४ दिवसांचे क्वारंटाईन अनिवार्य आहे. त्याचमुळे त्याला पहिल्या २ कसोटी सामन्यात खेळता येणार नाही.
त्यामुळे रोहितच्या मुंबईला येण्याच्या निर्णयावर टीका होत आहे. जर रोहितने आधीच ऑस्ट्रेलियाला जाण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित तो कसोटी मालिकेतील सामन्यांना मुकला नसता.
पण आता मुजुमदार यांनी रोहितच्या या निर्णयावर भाष्य करताना म्हटले आहे की ‘यानंतरही जर रोहितला कसोटी मालिका खेळायची नसती तर तो मुंबईत थांबू शकला असता. त्याला एनसीएमध्ये गेला नसता. तो त्याच्या कुटुंबासह वेळ घालवू शकला असता. पण रोहितने असे केले नाही. रोहितला कसोटी मालिका खेळायची नाही, असे म्हणने योग्य नाही.’
असे असले तरी अजून रोहित किंवा बीसीसीआयकडून याबद्दल अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम करण्यास रॉस टेलर सज्ज
…तर भारतीय संघाला एकही कसोटी सामना जिंकता येणार नाही, मायकल क्लार्कची भविष्यावाणी
टी२०, कसोटी मालिकेआधीच न्यूझीलंडचे दोन स्टार खेळाडू पडले बाहेर; सँटेनर करणार नेतृत्व
ट्रेंडिंग लेख –
बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके ठोकणारे ‘तीन’ विदेशी धुरंदर, दोन भारतीय कर्णधारांचा समावेश
विश्वास बसणार नाही! ‘हे’ तीन भारतीय ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकू शकले नाहीत वनडे शतक