इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी (१४ जुलै) खेळला गेला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने १० विकेट्स राखून विजय मिळवला होता, परंतु दुसऱ्या सामन्यात त्यांना १०० धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा काही खास कामगिरी करू शकला नाही, पण त्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये चांगले प्रदर्शन केले. पण नंतर मोईन अली, डेविड विले यांनी महत्वाच्या धावा केल्यामुळे संघाची धावसंख्या २०० पार गेली. यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत असे काही घडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, रोहितचा खांदा निखळला (dislocat) होता, जो त्याने स्वतःच्या हातानेच पुन्हा सेट देखील केला.
सामना सुरू असताना रोहित शर्माने केलेल्या या कलाकारीची दखल समालोचकांनीही घेतली. व्हिडिओत दिसत आहे की, मोईन अली रवींद्र जडेजाच्या चेंडूवर मीड विकेटच्या दिशेने एक हवाई शॉट खेळतो. रोहितने हा चेंडू रोखण्यासाठी त्याच्या डाव्या बाजूला हात पुढे केला, पण तेव्हाच त्याचा डावा खांदा निखळला. तरीदेखील रोहित जराही घाबरला नाही. त्याने उजव्या हाताने स्वतःचा डावा हात पकडला आणि खांदा पुन्हा एकदा सेट केला. रोहितचा हा व्हिडिओ पाहून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Rohit Sharma doing the Shoulder socket thing. #India #IndianCricketTeam #IndiaVSEnglandODIonSonyLIV pic.twitter.com/AIZinkMTlx
— Ashutosh Upadhyay (@Ashu__Upadhyay) July 14, 2022
https://twitter.com/AshwinDhavale/status/1547587872957485059?s=20&t=xNdvNrkjO9GcZlWADdxkPw
उभय संघातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ७६ धावा केल्या होत्या. शिखर धवनच्या साथीने त्याने हा सामना एकही विकेट न गमावता नावावर केलेला. परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने १० चेंडू खेळून देखील शून्य धावांवर विकेट गमावली. उभय संघातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी म्हणजेच १७ जुलै रोजी मॅनचेस्टरमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिका सध्या १-१ च्या बरोबरीवर असल्यामुळे हा शेवटचा सामना निर्णायक ठरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘बुमराहपेक्षा कमी नाही शाहीन आफ्रिदी’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान
‘आऊट ऑफ फॉर्म’ असलेल्या विराटला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, ‘मित्रा, आता तू हे करच…’
भारताचा टर्मिनेटर हरभजन सिंग करणार क्रिकेट मैदानात पुनरागमन, पाहा कधी आणि कोणता सामना खेळणार