कर्णधार रोहित शर्माचा विसरभोळेपणा जगजाहीर आहे. अनेक वेळा तो वस्तू ठेवतो आणि विसरतो. एवढेच नाही तर नाणेफेकीच्या वेळी तो खेळाडूंची नावंही विसरताना दिसला आहे. आता रोहितचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्यानं किती बॅग आणल्या याबाबत द्विधा मनस्थितीत दिसत आहे. ‘हिटमॅन’चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रोहित नुकताच कुटुंबासह सुट्या एंजॉय करून परतला आहे. 2024 टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर तो पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरासोबत ब्रेकवर गेला होता.
मुंबई विमानतळावर रोहित पत्नी आणि मुलीसोबत कारमध्ये बसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. रोहित ड्रायव्हिंग सीटवर आहे. गाडीचा दरवाजा बंद करण्यापूर्वी तो म्हणतो की 7 पिशव्या असाव्यात. मात्र, काही वेळानं रोहितला आठवतं की एक बॅग कमी आहे. यानंतर, ‘हिटमॅन’ कारची खिडकी उघडतो आणि म्हणतो की 7 नव्हे तर 8 बॅग असाव्यात. त्यानंतर तो गाडी घेऊन निघून जातो. रोहितच्या या मनोरंजक व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
Rohit Sharma and the art of forgetting things. 🤣👌 pic.twitter.com/XTNORB4R9f
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 27, 2024
एका युजरनं हसणाऱ्या इमोजीसह लिहिलं की, रोहित शर्मा पुन्हा एकदा काहीतरी विसरला. ‘हिटमॅन’ची ही स्टोरी कधीच संपणार नाही.” दुसरा म्हणाला, ”हे हिटमॅनचं रोजचं काम आहे.” दुसऱ्यानं टिप्पणी केली, ”आपण रोहित शर्माला विसरभोळा का म्हणू नये?”
रोहित शर्मा लवकरच पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला रोहित 2 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. रोहितशिवाय या मालिकेत स्टार फलंदाज विराट कोहलीही खेळणार आहे. 27 जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 मालिका होणार आहे, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करेल.
हेही वाचा –
हार्दिक पांड्या इतिहास रचण्याच्या जवळ! अशी कामगिरी करणारा बनेल पहिलाच भारतीय
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भोंगळ कारभार; भारतीय खेळाडूंना जेवण मिळालं नाही, प्रवास करतानाही अडचणी
3 खेळाडू जे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतून बाहेर झाले, एक जण तर रुग्णालयात दाखल!