---Advertisement---

मालिका जिंकल्यानंतर रोहित वैयक्तिक प्रदर्शनावर खुश! विश्चचषक संघाबाबत दिली खास प्रतिक्रिया

Rohit Sharma
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना बुधवारी (27 सप्टेंबर) पार पडला. राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळताना ऑस्ट्रेलियाने हा सामना 66 धावांनी जिंकला. असे असले तरी, तीन सामन्यांची मालिका भारताच्या नावावर झाली. मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा याने खेळाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. सोबतच त्याचे वक्तव्य देखील चर्चेत आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही वनडे मालिका तीन सामन्यांची होती. शेवटच्या वनडे सामन्यात बुधावरी (27 सप्टेंबर) भारताला विजय मिळाला नसला, तरी मालिका यजमान संघाच्या नावावर झाली. पहिल्या दोन सामन्यांमध्ये नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्रांती होती, पण केएल राहुल (KL Rahul) याच्या नेतृत्वात भारताने विजय मिळवला. अशात रोहितने मालिका विजयाचे श्रेय देखील केएल राहुलला दिला. विजयाची ट्रॉफी घेण्यासाठी रोहितने स्वतः पुढे न जाता राहुलला बोलावले. त्याने दाखवलेल्या खेळाडू वृत्तीसाठी कर्णधाराचे कौतुक केले जात आहे.

रोहितचे वौयक्तिक प्रदर्शन देखील बुधवारच्या तिसऱ्या वनडे सामन्यात अप्रतिम राहिले. कर्णधार स्वतःच्या खेळीवर खुश असल्याचे दिसते. तो म्हणाला, “मी खूप खुश आहे (स्वतःच्या प्रदर्शनावर). नक्कीच मला सर्व पद्धतीने खेळायचे आहे. पण जोपर्यंत मी असे मारत (शॉट्स) आहे, तोपर्यंत आनंदी आहे. मागच्या 7-8 वनडे सामन्यांमध्ये आम्ही वेगवेगळ्या वातावरणात चांगले प्रदर्शन केले. आम्हाला वेळोवेळी आव्हाने दिली गेली आणि आम्ही ती स्वीकारली. दुर्दैवाने आजच्या सामन्याचा निकाल आमच्या मनाप्रमाणे आला नाही. पण मी या सामन्यावर जास्त लक्ष देणार नाही. आम्ही खरोखर खूप चांगल्या पद्धतीने खेळलो.”

दरम्यान, वनडे विश्वचषकासाठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघाबाबत देखील रोहित यावेळी बोलला. कर्णधाराच्या मते विश्वचषकासाठी निवडलेला संघ विचारपूर्वक आणि पूर्ण विचार करून निवडला आहे. रोहित म्हणाला, “15 सदस्यीय संघाविषयी बोलायचे झाले, तर आम्हाला काय हवे आहे आणि कोणते खेळाडू संघासाठी ती जबाबदारी पार पाडू शकतात, याविषयी आमच्याकडे स्पष्टता होती. आम्ही जराही संभ्रमात नव्हतो. आपण नेमके कोणत्या दिशेने चाललो आहोत हे माहीत होते.” दरम्यान, विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडल्यानंतर कर्णधार, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पण मागच्या काही दिवसांमधील भारतीय संघाचे प्रदर्शन पाहून या टीका आणि उपस्थिती केलेले प्रश्न चुकीचे ठरत आहेत. (Rohit Sharma gave a special reaction after winning the series against Australia)

महत्वाच्या बातम्या – 
BREAKING! आयपीएलमध्ये विराटशी पंगा घेणाऱ्या नवीनने केली वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
कमबॅकसाठी केन विलियम्सन तयार! सराव सामन्याआधी दिली खास प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---