भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी आणि वनडे मालिका खेळला. मात्र, भारत आणि वेस्ट इंडिज संघात होणाऱ्या टी20 मालिकेचा तो भाग नाही. रोहित शर्मा सध्या अमेरिकेत आहे. अमेरिकेत तो एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. दरम्यान त्याला पाकिस्तानी गोलंदाज आणि विश्वचषक 2023 संदर्भात प्रश्न विचारण्यात आले.
रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याच्या अनोख्या उत्तरांसाठी प्रसिद्ध आहे. रोहितच्या उत्तरांनी लोकांच्या चेहऱ्यावर हसू येत. यावेळीही असेच झाले, जेव्हा त्याने पाकिस्तान संघातील सर्वात कठीण गोलंदाजाबद्दल उत्तर दिले. रोहितने या प्रश्नाचे उत्तर दिलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
रोहित शर्माला विचारण्यात आले की, पाकिस्तानच्या संघातील सर्वात चांगला गोलंदाज कोण आहे, असे तुम्हाला वाटते? यावर भारतीय कर्णधार म्हणला, “सगळेच चांगले गोलंदाज आहे. मी कोणाचेही नाव घेणार नाही. नाव घेतल्याना खूप वाद होतात. एका खेळाडूचे नाव घेतले तर दुसऱ्या खेळाडूला आवडणार नाही.” असे तो म्हणाला.
रोहितचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले लोक जोरजोरात हसू लागले. या कार्यक्रमात रोहित शर्माची पत्नी रितिका देखील उपस्थित होती. तिलाही रोहितच्या उत्तरावर हसू आवरले नाही.
https://twitter.com/SharyOfficial/status/1688588985298305024?s=20
2019 विश्वचषकादरम्यानही रोहितने दिले होते खास उत्तर दिले होते
विश्वचषक 2019 मध्ये रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 140 धावा केल्या होत्या. हा सामना संपल्यानंतर पत्रकार परिषदेत रोहितला विचारले की, तो पाकिस्तानी फलंदाजांना काही सल्ला देऊ इच्छितो का? याला उत्तर देताना रोहित शर्मा म्हणाला होता की, “भविष्यात मी पाकिस्तान संघाचा फलंदाजीचा प्रशिक्षक झालो, तर नक्कीच सल्ला देईन. रोहित शर्माचे हे उत्तरही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. (rohit sharma gave funny answer to who pakistan hard bowler)
महत्वाच्या बातम्या-
WIvsIND । हार्दिक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत, तिसऱ्या टी20 सामन्यात ‘या’ मोठ्या बदलाची शक्यता
‘सिस्टम कुठेतरी चूकत आहे…’, आयसीसीच्या ‘या’ नियमावर स्टुअर्ट ब्रॉड नाराज