इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पार पडलेल्या सामन्यात मुंबई संघाने १३ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाकडून न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज एडम मिल्ने याला संधी देण्यात आली होती. स्वतः कर्णधार रोहित शर्माने त्याला मुंबई इंडियन्स संघाची कॅप दिल्याचे पाहायला मिळाले होते. चला तर जाणून घेऊया कोण आहे हा ॲडम मिल्ने?
न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज ॲडम मिल्ने याने गेल्या काही वर्षात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये न्यूझीलंड संघासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने न्यूझीलंड संघासाठी खेळताना ४० वनडे सामन्यात ४१ गडी बाद केले आहेत. तर २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला २८ गडी बाद करण्यात यश आले आहे.
जगातील सहावा सर्वात जलद गोलंदाज
न्यूझीलंड संघाचा हा वेगाचा बादशहा १५० किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करु शकतो. तसेच ॲडम मिल्ने हा जगातील ६ वा वेगवान गोलंदाज ठरला आहे, ज्याने १५३.२ किमी प्रती तास वेगाचा चेंडू फेकला आहे. यामुळेच की काय रोहित शर्माने ॲडम मिल्नेला आपल्या संघात स्थान दिले आहे. मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांसारखे गोलंदाज आहेत. अशातच ॲडम मिल्नेच्या येण्याने मुंबई इंडियन्स संघाची वेगवान गोलंदाजी आणखी मजबूत झाली आहे.
The 𝘃𝗲𝗿𝘆 fast and the furious 🔥👊@AdamMilne19 makes his #MI debut tonight! 💙#OneFamily #MumbaiIndians #MIvSRH #IPL2021 pic.twitter.com/JrRwF6yiEr
— Mumbai Indians (@mipaltan) April 17, 2021
ॲडम मिल्नेने आयपीएल २०१६ आणि २०१७ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु त्याला अवघे ५ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या ५ सामन्यात त्याला अवघे ४ गडी बाद करण्यात यश आले होते. यामुळे तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातून त्याला रिलीज करण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
MIvSRH: फॉर्मात असलेल्या नटराजनला संघाबाहेर ठेवण्यामागचे कारण काय? संघ डायरेक्टरनी दिले उत्तर
‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी