भारत आणि वेस्ट इंडिजया दोन संघांमध्ये सध्तया टी-२० मालिका सुरू आहे. वनडे सामन्यात विंडिजला ३-०ने मात दिल्यानंतर भारतीय संघ टी-२० मालिका खिशात घालण्याच्या तयारीत आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा पुनरागमन करत आहे. रोहितने वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती घेतली होती. आता पुनरागमन केल्यानंतर रोहितचे लक्ष्य भारतीय दिग्गजांच्या यादीत सामील होण्याचे असेल.
खरं तर, टीम इंडियासाठी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ हजारांहून अधिक धावा करण्याचा पराक्रम केवळ सहा खेळाडूंच्या नावावर आहे. रोहितही आता दिग्गजांच्या या विशेष यादीत समाविष्ट होईल. रोहितला या यादीत समाविष्ट होण्यासाठी आता केवळ ४४ धावांची आवश्यकता आहे.
भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत पहिले नाव येते माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे. सचिनच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४,३५७ धावा केल्या आहेत. यानंतर सध्याचे प्रशिक्षक आणि माजी महान फलंदाज राहुल द्रविडचे नाव येते. द्रविडच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४,२०८ धावा केल्या आहेत. या खेळाडूंच्या खालोखाल तिसऱ्या स्थानावर विराट कोहली (२३,७२६), माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (१८,५७५) चौथ्या स्थानावर, एमएस धोनी (१७,२६६) पाचव्या स्थानावर आणि वीरेंद्र सेहवाग (१७,२५३) सहाव्या स्थानावर आहे.
रोहितने देशासाठी आतापर्यंत ४५ कसोटी सामने खेळले आहेत, ७७ डावात ४६.१ च्या सरासरीने ३१३७ धावा, वनडेच्या २२६ डावात ४८.६ च्या सरासरीने ९३७६ धावा, तर १२९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १२१ डावात ३२.१८ च्या सरासरीने ३४४३ धावा केल्या आहेत शर्माच्या बॅटने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,९५६ धावा केल्या आहेत.त्यामुळे आता रोहितला १६,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठण्यासाठी केवळ ४४ धावांची आवश्यकता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
या आठवड्यात टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहिर होणार! पाहा काय आहेत संभावना
भारत पाकिस्तान एजबॅस्टन वर भिडणार, आपण मात्र ‘या’ ठिकाणी सामना पाहणार!
स्पष्टपणे आऊट दिसत असतानाही शफालीला का दिले गेले नॉट आउट?