---Advertisement---

ब्रॅडमन यांचा विक्रम मोडणे नक्कीच सोपं नव्हतं, रोहितने इतिहास घडवलाच!

---Advertisement---

विशाखापट्टणम। आजपासून(2 ऑक्टोबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली आहे. भारताने या सामन्यात आज पहिल्या दिवसाखेर 59.1 षटकात बिनबाद 202 धावा केल्या आहेत.

भारताकडून पहिल्या दिवसाखेर सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा 174 चेंडूत 115 धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत 12 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. तर मयंक अगरवाल 183 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह 84 धावांवर नाबाद खेळत आहे.

या सामन्यात रोहितने शतकाबरोबरच महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे. रोहितची मायदेशात कसोटी खेळताना धावांची सरासरी आज पहिल्या दिवसाखेरपर्यंत 98.22 अशी झाली आहे.

त्यामुळे त्याने कमीतकमी मायदेशात 10 कसोटी डाव खेळलेल्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक सरासरी असणाऱ्या ब्रॅडमन यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

ब्रॅडमन यांचीही त्यांच्या मायदेशात(ऑस्ट्रेलियात) खेळताना कसोटीमध्ये 98.22 अशी सरासरी आहे. ब्रॅडमन यांनी त्यांच्या कारकिर्दीत मायदेशात 33 कसोटी सामने खेळताना 98.22 च्या सरासरीने 4322 धावा केल्या आहेत.

तसेच रोहितने भारतात खेळताना 10 कसोटी सामन्यात 98.22 च्या सरासरीने 800 हून अधिक धावा केल्या आहेत.

आजपासून सुरु झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने पहिल्या दिवसाचा दुसऱ्या सत्रानंतरचा खेळ रद्द करण्यात आला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहितला जगातील टॅलेंटेड खेळाडू का म्हणतात त्याच कारण आज मिळालंच

असं टायमिंग भल्या भल्यांना जमलं नाही, रोहितचा नादच खुळा

‘सलामीवीर’ रोहित शर्माचे द. आफ्रिकेविरुद्ध शानदार शतक पूर्ण…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment