नुकताच ऑस्ट्रेलियामध्येे टी20 विश्वचषक खेळला गेला. या विश्वचषकात भारतीय संघाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताला पराभवाचा स्वीकार करावा लागला. या पराभवामुळे कर्णधार रोहित शर्मा याच्यावर प्रचंड टीकांचा भडीमार झाला. त्याचबरोबर रोहितला त्याच्या फिटनेसवरुनही ट्रोल केले जात होते. विश्वचषकात मिळालेल्या पराभवानंतर मायदेशी परतलेल्या रोहितने लेगेच सरावाला सुरुवात केली. याबाबतचे फोटो त्याने त्याच्या सोशल मिडीया हॅॆडलवरुन शेअर केले.
या टी20 विश्वचषकात भारताचे प्रदर्शन साखळी सामन्यांमध्ये चांगले होते. मात्र, उपांत्य फेरीत इंग्लंड संघाने भारतीय संघाचा 10 गडी राखून पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. ज्यामुळे भारतीय खेळाडू आणि चाहते चांगलेच नाराज झाले. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यावर देखील प्रश्नचिन्हे निर्माण केले गेले. पूर्ण विश्वचषकात रोहित फंलदाजीबरोबरच कर्णधार म्हणूनही अपयशी ठरला. बऱ्याच दिग्गजांनी तर रोहितला कर्णधार पदावरुन हटवण्याचा सल्ला देखील दिला.
त्यातच भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या रोहितने मैदानावर पुनरागमन करत चांगला सराव सुरू केला असून या सरावाचे फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून देखील शेअर केले आहेत. रोहितच्या या फोटोंना त्याचे चाहते प्रचंड पसंत करत आहेत आणि यावर आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. या पोस्टवर प्रतिक्रिया देणारे बरेच लोक त्याला जुन्या रंगात बघायला उत्सुक आहेत.
न्यूझीलंड दौऱ्यावर वरीष्ठ खेळाडूंना दिला गेला आराम
भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. बीसीसीआयने या दौऱ्यावर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुल (KL Rahul) या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. राहितच्या अनुपस्थितीत टी20 संघाची कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या सोपवली असून एकदिवसीय संघाची कमान शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या हाती देण्यात आली आहे.
डिसेंबर महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यावर रोहित पुन्हा कर्णधारपदाच्या भुमिकेत खेळताना दिसेल. पुढच्या महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यावर भारताला 3 एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 डिसेंबरला होणार असून शेवट 26 डिसेंबरला होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनी ते युवराज, ‘हे’ 5 दिग्गज भारतीय बनू शकत नाहीत टीम इंडियाचे निवडकर्ते; पण का?
क्रिकेट विश्वचषकाची बक्षीस रक्कम फुटबॉल वर्ल्डकपच्या तुलनेत पाणी कम चाय! आकडा वाचून येईल आकडी