---Advertisement---

फक्त विराट कोहलीच नाही तर रोहित शर्मानेही मयंकला केला होता हा इशारा, पहा व्हिडिओ

On: शनिवार, नोव्हेंबर 16, 2019 1:38 PM
---Advertisement---

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश संघात सध्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात शुक्रवारी(15 नोव्हेंबर) भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालने द्विशतकी खेळी केली.

त्याने भारताकडून शुक्रवारी पहिल्या डावात खेळताना 330 चेंडूत 243 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 8 षटकार मारले. त्याच्या या खेळी दरम्यान त्याला भारतीय ड्रेसिंगरुममधून अनेक इशारे केले जात होते.

मयंकने त्याचे द्विशतक पूर्ण केल्यानंतर तो 210 धावांवर खेळत असताना भारतीय ड्रेसिंग रुममधून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने त्याला आक्रमक खेळ आजच डाव संपवायचा आहे असा इशारा केला.

हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. रोहितने मयंकला आक्रमक खेळण्याचा इशारा केल्यानंतर ड्रेसिंग रुममधील सर्वांना हसू आवरता आले नाही.

https://twitter.com/CriciCism/status/1195289390274076678

रोहितने दिलेला हा इशारा मयंकनेही पाळल्याची शक्यता आहे. कारण त्याने त्यानंतर आक्रमक खेळायला सुरुवात केली. मात्र तो त्याच्या खेळीतील 9 वा षटकार मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

विशेष म्हणजे मयंकने जेव्हा दिडशतक पूर्ण केले तेव्हा भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याला संयमाने खेळत रहा आणि द्विशतक पूर्ण कर अशाप्रकारचे हातवारे करत इशारा दिला. यावर मयंकनेही ठिक आहे, असे हात उंचावून त्याला होकार दिला.

https://www.instagram.com/p/B44TNWmAlFy/

त्यानंतर ज्यावेळी मयंकने द्विशतक पूर्ण केले, त्यावेळेस त्याने ड्रेसिंगरुमकडे पाहत द्विशतक पूर्ण झाले असा इशारा केला. याचवेळी विराटनेही आता त्रिशतक कर असा हसून इशारा दिला होता. याचे व्हिडिओ बीसीसीआयने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

https://www.instagram.com/p/B44gR4hgObb/

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---