भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर व कर्णधार रोहित शर्मा यांनी सोमवारी (21 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. या दोघांनी माध्यमांसमोर आगामी आशिया चषकासाठी संघ घोषित केला. या संघात अशा अनेक खेळाडूंना संधी मिळाली नाही ज्यांच्या निवडीची अपेक्षा केली जात होती. त्याविषयी रोहित व आगरकर यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
आशिया चषकासाठी निवडलेल्या 17 सदस्यीय संघात फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादव याचा समावेश केला गेला आहे. त्याला रवींद्र जडेजा व अक्षर पटेल हे अष्टपैलू साथ देतील. आशिया चषकासाठी युजवेंद्र चहल व रविचंद्रन अश्विन यापैकी एकाची निवड होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, दोघांनाही डावलले गेले. याविषयी प्रश्न विचारला असता कर्णधार रोहित म्हणाला,
“विश्वचषकासाठी अजूनही कोणाची संघातील प्रवेशाची दारे बंद झालेली नाहीत. चहल, रविचंद्रन अश्विन व वॉशिंग्टन सुंदर हे अजूनही संघात प्रवेश करू शकतात.”
सध्या कुलदीप भारताचा पहिल्या पसंतीचा फिरकीपटू म्हणून दिसून येत आहे. विश्वचषकासाठी भारतातील परिस्थिती पाहता आणखी एका फिरकीपटूची गरज पडू शकते. त्यामुळे विश्वचषक संघात चहल अथवा अश्विन यांची निवड केली जाईल असा अप्रत्यक्ष संकेत रोहितने दिल्याचे बोलले जात आहे. चहल याला वेस्ट इंडीज दौऱ्यावर वनडे संघात स्थान दिले गेले नव्हते. तर, अश्विन दोन वर्षांपासून वनडे क्रिकेट खेळलेला नाही.
आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राखीव खेळाडू – संजू सॅमसन
(Rohit Sharma Hints No Door Close For Ashwin And Chahal For World Cup)
महत्वाच्या बातम्या –
आफ्रिदीचा टी10 मध्ये राडा! वयाच्या 43 व्या वर्षी केल्या 300 च्या स्ट्राईक रेटने धावा
BIG BREAKING! आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा, प्रमुख फलंदाजांचे संघात पुनरागमन