आयपीएल 2023 मध्य शनिवारी मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्स संघ आमने-सामने आले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील फलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर पंजाबने तुफानी फटकेबाजी करत 214 धावा काढल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबईला कर्णधार रोहित शर्मा व कॅमेरून ग्रीन यांनी आक्रमक फटकेबाजी करत सामन्यात कायम ठेवले. रोहितने आपल्या या खेळी दरम्यान एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
पंजाबने वादळी फटकेबाजी करत मुंबईला घरच्या मैदानावर मोठे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना ईशान किशन स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर रोहित शर्मा व कॅमेरून ग्रीन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 76 धावांची भागीदारी केली. रोहितने 27 चेंडूंवर 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 44 धावा केल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 162 पेक्षा जास्त राहिला. रोहित अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना लियाम लिव्हिंगस्टोन याने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केले.
रोहितने या सामन्यात तिसरा षटकार मारताना आयपीएलमध्ये आपले 250 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. आयपीएलमध्ये त्याच्यानंतर सर्वाधिक षटकार मारणार दुसरा भारतीय फलंदाज एमएस धोनी असून, त्याच्या नावे 235 षटकार जमा आहेत. तर विराट कोहलीने आतापर्यंत 229 षटकार ठोकलेत.
आयपीएल मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान दिग्गज ख्रिस गेल याला जातो. त्याने आपल्या कारकिर्दीत तब्बल 357 षटकार घेतले आहेत. तर या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी एबी डिव्हिलियर्स असून, त्याने 251 वेळा चेंडू षटकारपार मारला आहे. पुढील सामन्यात रोहितकडे डिव्हिलियर्स याचा विक्रम मोडून दुसऱ्या स्थानी येण्याची संधी असेल.
(Rohit Sharma Hits 250 Sixes In IPL Become First Indian Who Did This Gayle Tops Chart)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपने स्टंप्ससह तोडले मुंबईकरांचे हृदय! अखेरच्या षटकात पंजाबचा 13 धावांनी विजय
पंजाबच्या फलंदाजांचा झंझावात! डेथ ओव्हर्समध्ये मुंबईच्या गोलंदाजांचा काढला घाम