त्रिनिदाद येथे वेस्ट इंडीज व भारत यांच्या दरम्यान दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाने सुरुवातीला सामन्यावर पकड बनवत यजमान संघाला 255 धावांवर सर्वबाद केले. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरल्यावर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी अक्षरशः टी20 स्टाईल धुलाई करत 35 चेंडूंमध्ये आपल्या कारकिर्दीतील सोळावे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.
मोहम्मद सिराज याने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला यजमान संघ केवळ 26 धावांची भर घालून तंबूत परतला. वेस्ट इंडीज 255 धावांवर सर्वबाद झाल्याने भारतीय संघाला 183 धावांची आघाडी मिळाली. ही आघाडी घेऊन दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जयस्वाल यांनी पुन्हा एकदा दमदार सलामी दिली.
दोघांनी सलग तिसऱ्या डावात अर्धशतकी सलामी देत 35 चेंडूंवर 50 धावा धावफलकावर लावल्या. भारतीय संघाचा धावफलक वेगाने पुढे नेत रोहित शर्मा ने केवळ 35 चेंडूंमध्ये आपल्या कसोटी कारकिर्दीतील सोळावे अर्धशतक झळकावले. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. अर्धशतकानंतर मात्र तो फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. गॅब्रियल याच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी त्याने 44 चेंडूंवर 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 57 धावांची आक्रमक खेळी केली.
रोहित बाद झाल्यानंतर मैदानावर पावसाचे आगमन झाल्याने लंचसाठी वीस मिनिटांचा अवधी शिल्लक असतानाच खेळ थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने एक बाद 98 धावा केल्या होत्या. यशस्वी जयस्वाल नाबाद 37 तर शुबमन गिल खेळत होता. यादरम्यान भारतीय संघाची आघाडी 281 धावांची झालेली.
(Rohit Sharma Hits 35 Balls Fifty In Trinidad Test India Lead 281)
आणखी वाचा:
त्रिनिदादमध्ये सिराजचा कहर! पाच बळींनी यजमानांना 255 वर गुंडाळले, भारताकडे 183 धावांची आघाडी
सात्विक-चिरागचे कोरिया ओपनवर ‘राज’! पुरूष दुहेरीचे विजेतेपद केले नावे