भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक रेकाॅर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. रोहित सर्व यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे काही रेकाॅर्ड्स असे आहेत, जे कोणत्याही फलंदाजासाठी मोडित काढणे अशक्य ठरू शकतात. त्यातीलच एक रेकाॅर्ड म्हणजे रोहितची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 264 धावांची तुफानी खेळी. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण रोहितचे असे रेकाॅर्ड्स जाणून घेऊया, जे कोणत्याही फलंदाजाला मोडणे अशक्य ठरेल.
वास्तविक, भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्व फॉरमॅटमध्ये एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. तो जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार ठोकणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 484 सामन्यांच्या कारकिर्दीत 620 षटकार मारले आहेत. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जगातील इतर कोणत्याही फलंदाजाला 600 षटकारांचा आकडा गाठता आला नाही. रोहितनंतर वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलने (Chris Gayle) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 553 षटकार ठोकले आहेत.
रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने 2024चा टी20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर रोहितने टी20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकाॅर्डही रोहितच्या नावावर आहे. रोहितने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 159 सामने खेळताना 205 षटकार ठोकले. टी20 मध्ये 200 षटकारांचा आकडा गाठणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने 60 कसोटी, 265 एकदिवसीय आणि 159 टी20 सामने खेळले आहेत. 60 कसोटीत त्याने 44.60च्या सरासरीने 4,148 धावा केल्या आहेत, तर 265 एकदिवसीय त्याने 10,866 धावा केल्या आहेत. 159 टी20 सामन्यात रोहितने 4,231 धावा केल्या आहेत. तिन्ही फाॅरमॅटमध्ये एकूण रोहितच्या नावावर 48 शतके आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे तो फलंदाज…ज्यानं वयाच्या 25व्या वर्षी केली डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी! दोन्ही हातांनी करतो गोलंदाजी
बांगलादेशच्या चाहत्यावर हल्ला झाला नाही, पोलिसांनी उघड केलं सत्य
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाची बॅटिंग, लवकरच खेळ संपला