आयपीएल २०२० मधील पहिला क्वालिफायर सामना दुबईत गुरुवारी (५ नोव्हेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा गोल्डन डकवर बाद झाला. यासह त्याने आपल्या नावावर नकोश्या विक्रमाची नोंद केली.
२०१८ पासून चार वेळा गोल्डन डक
नाणेफेक जिंकत दिल्ली संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत मुंबईला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यावेळी प्रथम फलंदाजी करताना मुंबईकडून रोहित आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने डावाची सुरुवात केली. पहिल्याच षटकात ३ चौकार ठोकत डी कॉकने संघाची धावसंख्या १५ अशी केली. परंतु रोहितला मात्र चमकदार दमदार सुरुवात करून देता आली नाही. दिल्लीचा फिरकीपटू आर अश्विन टाकत असलेल्या डावाच्या दुसऱ्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहित पायचीत झाला. त्यामुळे तो चौथ्यांदा पहिला चेंडू खेळताना शून्य धावेवर बाद (गोल्डन डकवर) होणारा फलंदाज ठरला.
सन २०१८ पूर्वी रोहितच्या नावावर एकही गोल्डन डक नव्हता. परंतु २०१८ पासून तो तब्बल ४ वेळा गोल्डन डक झाला आणि आपल्या नावावर एक नकोसा विक्रम केला.
या गोलंदाजांनी घेतली विकेट
रोहित शर्माला २०१८ साली उमेश यादव आणि जोफ्रा आर्चर या दोन वेगवान गोलंदाजांनी गोल्डन डकवर बाद केले होते. त्यानंतर २०२० मध्ये आर अश्विनने रोहितला गोल्डन डकवर बाद केले.
या खेळाडूंची केली बरोबरी
रोहितची आयपीएलमध्ये शुन्यावर बाद होण्याची ही १३ वी वेळ आहे. त्यामुळे त्याने आता आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाच्या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या पार्थिव पटेल आणि हरभजन सिंगची बरोबरी केली आहे. पार्थिव आणि हरभजन देखील प्रत्येकी १३ वेळा शुन्यावर बाद झाले आहेत.
विशेष म्हणजे रोहित, हरभजन आणि पार्थिव यांनी त्यांच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वाधिक सामने मुंबई इंडियन्स संघाकडून खेळले आहेत.
रोहितची या हंगामातील कामगिरी
आयपीएल २०२० मध्ये रोहितने आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २४ च्या सरासरीने केवळ २६४ धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान १२, ८०, ८, ७०, ६, ३५, ५, ३५, ९, ४ आणि ० अशा धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार का सलामीची जागा ?
-“रोहितची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी घेण्यात गैर नाही”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत
-संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-






