कोलकाता | बुधवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात मुंबईने कोलकाताचा तब्बल १०२ धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईने उभ्या केलेल्या २१० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव १०८ धावांवरच संपुष्टात आला.
या सामन्यात मुंबईकडून इशान किशनने ६२, सुर्याकुमार यादवने ३६, रोहित शर्माने ३६ तर बेन कटिंगने २४ धावा केल्या. कोलकाताकडून कोणत्याही फलंदाजाला विशेष चमक दाखवता आली नाही.
हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमवर झाला. तसेच या स्टेडियमशी खास नाते असलेल्या मुंबईकर रोहित शर्मासाठीही अनेक अर्थांनी खास ठरला. या सामन्यात रोहितने अनेक विक्रम करत आपले आणि या स्टेडियमचे खास नाते पुन्हा जगाला दाखवुन दिले.
असेच काही विक्रम ज्यातून या खेळाडूचे आणि इडन गार्डन स्टेडियमचे नाते अधोरेखित होते-
-कर्णधार म्हणुन रोहित शर्माचा हा आयपीएलमधील ५० वा विजय. योगायोग म्हणजे तो रोहितने याच मैदानावर साजरा केला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणुन पहिला सामनाही तो याच मैदानावर जिंकला होता.
-त्याचा हा टी२०मध्ये कर्णधार म्हणुन १००वा सामना होता. त्याने आयपीएलमध्ये ८६ सामन्यात, आंतरराष्ट्रीय सामन्यात ९ वेळा तर ५ सामन्यात चॅम्पियन लीगमध्ये संघाच कर्णधारपद भुषवल आहे.
-आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा हा कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सर्वात मोठा विजय
-रोहितने आयपीएलचा पहिला सामनाही २००८मध्ये याच मैदानावर खेळला होता.
-२०१२मध्ये याच मैदानावर त्याने आयपीएलमधील त्याचे वैयक्तिक शतक केले होते.
-२०१३मध्ये त्याने याच मैदानावर त्याने टी२० कर्णधार म्हणुन पहिला सामना खेळला होता.
-२०१३ आणि २०१५ मध्ये याच मैदानावर त्याने आयपीएलचे कर्णधार म्हणुन पहिले विजेतेपद जिंकले होते.
-२०१७मध्ये याच मैदानावर मुंबई इंडियन्सने रोहितच्या नेतृत्वाखाली १००वा विजय मिळवला होता.
दिवसातील महत्त्वाच्या बातम्या-