---Advertisement---

आयपीएलमध्ये खेळताना रोहित शर्माच्या मानधनात कशी झाली वाढ? घ्या जाणून

---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधारांमध्ये गणले जाते. कारण रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाला ५ वेळेस आयपीएलचे विजेतेपद जिंकवून दिले आहे. रोहित शर्मा याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात झाली होती ती डेक्कन चार्जर्स संघाकडून. त्याने या संघाकडून खेळताना मोठ्या धावा तर ठोकल्याच याशिवाय गोलंदाजी करतांना हॅटट्रिक ही घेतली. त्यानंतर रोहित शर्मा याला २०११ मध्ये मुंबई इंडियन्सने खरेदी करत संघात स्थान दिले. आता पहिल्या मोसमापासून ते आत्तापर्यंत रोहितच्या मानधनात जवळपास तब्बल ५ पटीने वाढ झाली आहे.

रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएल इतिहासात ५ वेळा विजेतपद

स्टार खेळाडूंनी भरलेल्या मुंबई इंडियन्स संघाचे कर्णधारपद स्विकारल्या नंतर रोहित शर्मावर जबाबदारी वाढली होती. तरी सुद्धा आपली जबाबदारी चोख पार पाडली. रोहित शर्मा याने २०१३, २०१५, २०१७,२०१९ आणि २०२० रोजी मुंबई इंडियन्स संघाला कर्णधार म्हणून विजेतेपदाचा मान मिळवून दिला. विशेष म्हणजे त्याच्याआधी कोणत्याही कर्णधाराला मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवून देता आले नव्हते.

रोहित शर्मा याचे मानधन कसे वाढले?

रोहित शर्मा याला सन २००८ च्या आयपीएल सत्रात डेक्कन चार्जर्स संघाने ३ करोड रुपयेमध्ये खरेदी केले होते. त्यानंतर साल २००९ आणि २०१० आयपीएल सत्रात रोहित शर्मा डेक्कन चार्जर्स संघासोबतच होता. सन २०११ च्या आयपीएल सत्रात मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्मा याला ९.२ करोड रुपयेमध्ये खरेदी केले. साल २०१३ पर्यंत रोहित शर्माचे मानधन ९.२ कोटी रुपये इतकेच होते.

त्यानंतर सन २०१४ मध्ये त्याला १२.५ करोड रुपये मानधन देण्यात आले आणि त्यानंतर साल २०१८ मध्ये त्याला १५ करोड रुपये मानधन देण्यात आले. सन २०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला कायम केल्यामुळे त्याचे मानधन आता १५ करोड रुपये इतकेच आहे. त्यामुळे आत्तापर्यंत रोहितने १०० कोटींपेक्षाही अधिक रक्कम केवळ कराराच्या मानधनातून कमावली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

‘आमच्या अंतर्गत प्रश्नात लुडबुड नको’, शेतकरी आंदोलनात नाक खुपसणाऱ्या रिहानाला भारतीय क्रिकेटपटूने फटकारले

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या २ कसोटीतून विश्रांती घेतल्याबद्दल टी नटराजनने दिली महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाला…

“भारतीय संघ विजयाचा १०० दक्के दावेदार आहे,” इंग्लंडच्या ‘या’ दिग्गजाचे भाष्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---