ब्रिस्टल। रविवारी 8 जुलैला भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तिसरा टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2000 धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
या 2000 धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त 14 धावांची आवश्यकता आहे. मागील 3 सामन्यांपासून हा विक्रम रोहितला हुलकावणी देत आहे. मागील तीन सामन्यात रोहितने अनुक्रमे 0,32, 5 अशा धावा केल्या आहेत.
त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 83 सामन्यात 31.3 सरासरीने 1986 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
जर रोहितने रविवारच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 2000 धावा पूर्ण केल्या, तर तो मिताली राज आणि विराट कोहली नंतरचा असा कारनामा करणारा तिसराच भारतीय खेळाडू ठरणार आहे.
तसेच पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तो 2000 धावा करणारा एकूण पाचवाच फलंदाज ठरेल. याआधी 4 खेळाडूंनी 2000 धावा केल्या आहेत. यात न्यूझीलंडचे ब्रेंडन मॅक्यूलम, मार्टीन गप्टील, पाकिस्तानचा शोएब मलिक आणि भारतीय कर्णधार विराट कोहली आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
2271 धावा – मार्टीन गप्टील (75 सामने)
2140 धावा -ब्रेंडन मॅक्यूलम (71 सामने)
2078 धावा – शोएब मलिक (102सामने)
2059 धावा – विराट कोहली (61 सामने)
1986 धावा – रोहित शर्मा (83 सामने)
महत्त्वाच्या बातम्या:
-हार्दिक पंड्याने एमएस धोनीला दिली ही खास भेट






