भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्यात २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत पराभव स्विकारावा लागला होता. यामुळे कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाला टीकांना सामोरे जावे लागले होते.
यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand vs India) ५ सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली होती. यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ५-०ने व्हाईटवॉश दिला होता. यामध्ये सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलने (KL Rahul) चांगली कामगिरी केली होती.
त्यानंतर ३ सामन्यांच्या वनडे आणि २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारतीय संघाचा दारूण पराभव केला होता. यावर आता न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघाचा संघसहकारी मिचेल मॅकलेनघनने (Mitchell McClenaghan) भारताच्या पराभवाचे कारण विराटला (Virat Kohli) नाही तर रोहितला जबाबदार ठरवले आहे. कारण रोहित न्यूझीलंडविरुद्ध वनडे आणि कसोटी मालिकेत खेळला नव्हता.
ट्विटरवर एका चाहत्याने मॅकलेनघनला प्रश्न विचारला होता की, तुम्हाला असं वाटतं का की नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्मामुळे फरक पडला असेल? या प्रश्नाला उत्तर देत मॅकलेनघन म्हणाला की, हो खरंच.

त्याचबरोबर आणखी एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना मॅकलेनघनने रोहितला सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे सांगितले. तसेच तो म्हणाला की, रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सकडून अनेक सामने खेळले आहेत. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टॉप ५: वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ खेळाडू






