भारत आणि श्रीलंका (Ind vs SL Test Series) यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारी (४ मार्च) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना मोहालीमध्ये खेळला जात आहे. विराट कोहली (Virat Kohli) याने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या रूपात भारतीय संघाला नवीन कसोटी कर्णधार मिळाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यातून रोहित शर्मा कसोटी कर्णधारपदाच्या कारकिर्दीची सुरुवात करत आहेत.
रोहित शर्माकडे कसोटी संघाचे नेतृत्व करण्याचा कसलाही अनुभव नाही, पण विराटने नेतृत्व सोडल्यानंतर संघाकडे रोहितपेक्षा योग्य पर्यात नव्हता. याच कारणास्तव कसोटी कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. वयाच्या ३४ वर्ष आणि ३०८ व्या दिवशी रोहित शर्मा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार बनला आहे.
त्यामुळे तो भारताचा सर्वात वयस्कर दुसरा कसोटी कर्णधार आहे. मागच्या ६० वर्षांमध्ये दिग्गज अनिल कुंबळे एकमेव भारतीय खेळाडू आहेत, जे सर्वात जास्त वयात भारताच्या कसोटी संघाचे कर्णधार बनले होते. ३७ वर्षे आणि ३६ दिवस इतके वय असताना कुंबळे यांनी पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्त्व केले होते.
दरम्यान, कसोटी कर्णधारपद स्वीकारण्यापूर्वी रोहितने भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधारपदही स्वीकारले आहे. मर्यादित षटकांमध्ये रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगले प्रदर्शन करत आहे आणि कसोटीमध्येही अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. रोहित जरी भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बनला असला, तरी त्याच्याकडे यापूर्वी कसोटी संघाच्या नेतृत्वाची कसलाही अनुभव नाही. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र त्याने काही सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे आणि याच अनुभवाच्या जोरावर तो आता भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी रोहितच्याच नेतृत्वात भारताने श्रीलंकेला टी-२० मालिके क्लीन स्वीप (३-०) दिला आहे. विराटच्या नेतृत्वात भारताचा कसोटी संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, आता रोहित शर्माला संघाची ही वाटचाल पुढे कायम ठेवायची आहे.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक काळाच्या पडद्याआड, यष्टीमागे घेतलेल्या ४३९ विकेट्स
रोहितने दिले रहाणे-पुजाराच्या पुनरागमनाचे संकेत; म्हणाला…
पुजारा-रहाणेला रिप्लेस करतील ‘हे’ खेळाडू? एकाला फक्त २ कसोटींचा अनुभव, पण आहे जबरदस्त लयीत