मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ आयपीएलच्या सोळाव्या सामन्यात आमनेसामने आले होते. चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर हा सामना खेळवला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करतांना मुंबईने २० षटकांत ५ बाद १३१ धावा केल्या.
मुंबईच्या या डावात कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाचे मोलाचे योगदान होते. त्याने ५२ चेंडूत ६३ धावांची खेळी उभारली. कर्णधार म्हणून आयपीएल मधील त्याचे हे २३वे अर्धशतक ठरले.
धोनीला टाकले मागे
कर्णधार म्हणून आयपीएल इतिहासात सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या विक्रमात रोहित शर्मा चौथ्या स्थानी पोहोचला. त्याने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले. यापूर्वी २२ अर्धशतकांसह धोनी चौथ्या स्थानी होता. मात्र आता रोहितने चौथे स्थान काबीज केले आहे.
या यादीत पहिल्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली आहे. त्याच्या नावे ३८ अर्धशतके आहेत. दुसर्या स्थानी माजी खेळाडू व कर्णधार गौतम गंभीर असून त्याच्या नावे ३१ अर्धशतके आहेत. तर तिसर्या क्रमांकांवर सनरायझर्स हैद्राबादचा विद्यमान कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये आजवर २६ अर्धशतके झळकावली आहेत.
कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके –
१) विराट कोहली – ३८
२) गौतम गंभीर – ३१
३) डेव्हिड वॉर्नर – २६
४) रोहित शर्मा – २३*
५) एमएस धोनी – २२
६) वीरेंद्र सेहवाग – १२
७) एडम गिलख्रिस्ट – १२
मुंबईची फलंदाजी पुन्हा अडखळली
दरम्यान, पंजाब विरुद्धच्या सामन्यात मुंबईची फलंदाजी पुन्हा अडखळली. धीमी सुरुवात करून शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करण्याचा मुंबईचा प्लॅन आजही फसला. त्यांच्याकडून फक्त रोहित शर्मा (६२) आणि सूर्यकुमार यादव (३३) यांनी मोठी खेळी केली. इतर सगळे फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांनी निर्धारित २० षटकांत केवळ ५ बाद १३१ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या:
Video: निकोलस पूरनने घेतला डोळ्यांचे पारणे फेडणारा कृणाल पंड्याचा अप्रतिम झेल, एकदा पाहाच