वनडे मालिकेनंतर भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताकडून रोहित शर्मा याने कर्णधार खेळी केली. रोहितने इंग्लंड दौऱ्यातील खराब फॉर्म सुधारत वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह त्याने एका विक्रमात विराट कोहलीला मागे टाकले आहे.
रोहितने (Rohit Sharma) सलामीला फलंदाजी करताना ६४ धावांची प्रशंसनीय खेळी केली आहे. या खेळीसाठी त्याने ४४ चेंडूंचा सामना केला आणि २ षटकार व ७ चौकारही मारले. हे रोहितचे आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील २७ वे अर्धशतक आणि ५० पेक्षा जास्त धावा करण्याची ३१ वी वेळ होती. १२९ सामन्यांतील १२१ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३१ वेळा ५० पेक्षा जास्त (Rohit Sharma Half Century) धावा फटकावल्या आहेत.
यासह रोहितने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या विक्रमात विराटला मागे सोडले आहे. विराटने ९१ डावांमध्ये ३० वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या.
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा:
३१ – रोहित शर्मा (१२१ डाव)
३० – विराट कोहली (९१ डाव)
२७ – बाबर आझम (६९ डाव)
२३ – डेविड वॉर्नर (९१ डाव)
२२ – मार्टिन गप्टिल (११२ डाव)
🚨 Milestone Alert 🚨
Congratulations to #TeamIndia captain @ImRo45 as he becomes the leading run-getter in T20Is (in Men's cricket). 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/qWZ7LSCVXA #WIvIND pic.twitter.com/koukfHIR2i
— BCCI (@BCCI) July 29, 2022
याखेरीज रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० सामन्यात धावांची पन्नाशी पार करण्याची ही सहावी वेळ होती. याबाबतीत तो विराटसोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी पोहोचला आहे. विराटनेही वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० क्रिकेट खेळताना ६ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
तसेच या अर्धशतकी खेळीसह रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील ३४०० धावांचा (Highest Run Scprer In T20I) आकडा पार केला आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलला मागे टाकत तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही बनला आहे. रोहितच्या खात्यात सध्या ३४४३ धावा आहेत. तर गप्टिल ३३९९ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर सरकला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
नाद नाद नादच! कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची ‘सिक्सर क्विन’ बनली हरमनप्रीत, व्हिडिओ व्हायरल
एमएस धोनीवरही भारी पडली ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, टी२० क्रिकेट इतिहासात केली मोठ्या विक्रमाची नोंद