---Advertisement---

खासच! सचिन एवढ्ढाच बाप विक्रम केलाय रोहितने, टी२०त केलाय कहर कारनामा

On: बुधवार, ऑगस्ट 31, 2022 7:47 PM
---Advertisement---

आशिया चषकातील भारत विरुद्ध हाँगकाँग सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात हाँग काँग संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरावे लागले. या सामन्यात रोहित शर्मा आणि के एल राहुल हे दोघे सलामीला आले. रोहित शर्माने या सामन्यात एक धाव काढत टी20 क्रिकेटमध्ये 3500धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.

विशेष म्हणजे टी20 क्रिकेटमध्ये 3500 धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा हा जगातील पहिला आणि सध्याचा एकमेव खेळाडू आहे. रोहितच्या पाठोपाठ न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टील 3497 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याने सर्वाधिक 3343 धावा केल्या आहेत. त्यामुळे आजवरच्या टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत देखील रोहित शर्मा अव्वल क्रमांकावर विराजमान आहे.

दरम्यान, क्रिकेटच्या इतर दोन्ही प्रकारात म्हणजेच वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत भारताचा माजी दिग्गज फंलदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने केल्या आहेत. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18426 धावा तर, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 15921 धावा केल्या आहेत. त्यामुळे सध्या क्रिकेटच्या सर्व प्रकारात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर भारतीय फलंदाजांचा दबदबा असल्याचे म्हंटले जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
“आता राशिद सर्वांना पार्टी देईल”; माजी कर्णधार अफगाणिस्तानच्या विजयाने आनंदला
जडेजाचं नाव घेत दिग्गज समालोचकाने उडवली मांजरेकरांची खिल्ली, वाचा सविस्तर

चमकदार विजयासह अंकित, रौनक, अभिनव मुख्य फेरीत 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---