fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

रोहित शर्मासाठी आजपासून सुरु झालेला कसोटी सामना आहे खास, जाणून घ्या कारण

इंदोर। आजपासून(14 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका(Test Series) सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना(1st Test Match) आजपासून होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदोर येथे सुरु झाला आहे. हा सामना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मासाठी(Rohit Sharma) खास आहे.

रोहितचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 350 वा सामना(350th Match) आहे. त्यामुळे तो 350 किंवा त्यापेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भारताचा 12 वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर जगातील 53 वा क्रिकेटपटू ठरला आहे.

रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 218 वनडे सामने, 101 टी20 सामने आणि 31 कसोटी सामने असे मिळून 350 सामने खेळले आहेत. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 44.16 च्या सरासरीने 13339 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा(Most International Matches) विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या(Sachin Tendulkar) नावावर आहे. सचिनने 664 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू –

664 – सचिन तेंडूलकर

538 – एमएस धोनी

509 – राहुल द्रविड

433 – मोहम्मद अझरुद्दीन

424 – सौरव गांगुली

403 – अनिल कुंबळे

402 – युवराज सिंग

394 – विराट कोहली

374 – विरेंद्र सेहवाग

367 – हरभजन सिंग

356 – कपिल देव

350 – रोहित शर्मा

You might also like