आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेचा 15वा हंगाम संयुक्त अमिराती येथे सुरू आहे. रविवारी (4 सप्टेंबर) दुबई येथे खेळला जाणारा पाकिस्तान विरुद्धच्या सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याच खेळाडूने केलेला नाही. त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताला चांगली सुरूवात करून दिली.
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा महिला आणि पुरूष आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी तो पुरूषांच्या यादीत 3520 धावा करत पहिल्या स्थानावर होता. तर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची सूजी बेट्स ही सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. तिने 3531 धावा केल्या आहेत. तसेच त्याने पाकिस्तान विरुद्ध 12 धावा करताच बेट्सला मागे टाकले आहे. तर त्याने 16 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकार मारत 28 धावा केल्या. यामुळे तो आता 3548 धावा केल्या आहेत.
रोहितने 2007मध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. त्याने दुसऱ्या सामन्यात नाबाद 50 धावांची खेळी केली. तो काही भारताचा नियमित खेळाडू नव्हता. मात्र त्याने स्थानिक सामने आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी करत भारतीय संघातील आपले स्थान कायम केले आहे. त्याने 134 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 4 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे.
सर्वाधिक धावा करताना रोहित आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 165 षटकार मारले आहेत. तर पहिल्या स्थानावर न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टीन गप्टील आहे. त्याने 121 सामने खेळताना एकूण 171 षटकार फटकारले आहेत.
रोहित आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक शतक करणारा एकमेव खेळाडू आहे. तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक पन्नासपेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली याच्यासोबत पहिल्या स्थानावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvsPAK: राहुलचे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! चांगल्या सुरुवातीनंतर धरला पव्हेलियनचा रस्ता
लिजेंड्स लीग गाजवायला येतोय ‘युनिव्हर्स बॉस’; सुल्तान सेहवागसह करणार ओपनिंग
‘देशी कोंबड्यांचे इजेक्शन द्या त्यांना!’ खेळाडूंच्या दुखापतींमुळे पाकिस्तानी दिग्गज संतापला