Saturday, January 28, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘देशी कोंबड्यांचे इजेक्शन द्या त्यांना!’ खेळाडूंच्या दुखापतींमुळे पाकिस्तानी दिग्गज संतापला

'देशी कोंबड्यांचे इजेक्शन द्या त्यांना!' खेळाडूंच्या दुखापतींमुळे पाकिस्तानी दिग्गज संतापला

September 4, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Shaheen Afridi & Babar Azam

Photo Courtesy: Twitter/Pakistan Cricket


आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान रविवारी (4 सप्टेंबर) दुसऱ्यांदा आमने सामने असतील. उभय संघातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. परंतु या सामन्यापूर्वी खेळाडूंना झालेल्या दुखापती, हा पाकिस्तान संघासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानी याला दुखापत झाल्यामुळे तो सुपर फोरमध्ये भारताविरुद्ध खेळू शकणार नाही. संघातील खेळाडूंना वारंवार दुखापत होत असल्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीज याने मोठी आणि मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. 

मोहम्मद हाफीज (Mohammad Hafeez) मागच्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि बीसीसीआय यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच आता त्याने पकिस्तान संघाचे खेळाडू आणि संघ व्यवस्थापनावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एका पाकिस्तानी टीव्ही चॅनलवर बोलताना हाफीज म्हणाला की, त्यांच्या खेळाडूंना फिट राहण्यासाठी देशी कोंबड्यांचे इंजेक्शन दिले पाहिजे.

यावेळी हाफीज पाकिस्तानी खेळाडूंच्या दुखापतीमुळे खूपच निराश वाटत होता. तो म्हणाला की, “मी संघ व्यवस्थापनाकडे अपील करू इच्छितो की, खेळाडूंना देशी कोंबड्यांचे इंजेक्शन लावून घेतले पाहिजेत. दोन-दोन सामने खेळून हे दुखापतग्रस्त होत आहेत. ज्याच्याविषयी असे सांगितले जाते की, हे खेळाडू तयार आहेत, पण पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येताच दोन सामन्यांनंतर त्यांची फिटनेस खराब होते. संघ व्यवस्थापनाने त्यांच्या फिटनेसविषयी गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही काही चेष्टीची बाब नाहीये. खेळाडूंना नेमकी महत्वाच्या सामन्याआधी दुखापत होते, ज्याचा थेट परिणाम सगळ्या संघावर होतो.”

Muhammad Hafeez on fire. Desi murghi ke injection lagwaie jaien players ko.😅😂🤣😇@MHafeez22pic.twitter.com/tbHgpTimF7

— Zohaib (Cricket King) 🏏 (@Zohaib1981) September 3, 2022

दरम्यान, आशिया चषक सुरू होण्यापूर्वी पकिस्तानचा प्रमुख वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिती याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला या संपूर्ण स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्याव्यतिरिक्त भारताविरुद्धच्या सामन्यात त्यांचा वेगवान गोलंदाज नसीम शाह दुखापतीमुळे वेदनेत दिसला होता. तसेच मोहम्मद वसीम देकील पाठदुखीमुळे आशिया चषकातून बाहेर झाला आहे. अशात खेळाडूंना होणाऱ्या सतत दुखापतींमुळे पाकिस्तान संघाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. दुसरीकडे भारतीय संघाची परिस्थितीही पाकिस्तानपेक्षा वेगळे नाही. आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अष्टपैलू रविंद्र जडेजा चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता, पण दुखापतीमुळे तो या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तसेच आवेश खान देखील वायरल झाल्यामुळे रविवारी पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याची शक्यता आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
साधेभोळे राहुल द्रविड S**y शब्द उच्चारायला लाजले! पत्रकार परिषदेतील व्हिडिओ तुफान व्हायरल
INDvPAK| वेगवान गोलंदाजी फळीला मजबूत बनवेल ‘हा’ पठ्ठ्या, आवेशची घेईल जागा; स्वत:च दिलीय हिंट
Asia Cup: पाकिस्तानविरुद्ध भारताला घ्यावा लागणार मोठा निर्णय, दिनेश कार्तिकला बसावे लागेल बाहेर!  


Next Post
Virat-Kohli-Ravindra-Jadeja

INDvsPAK: मागच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या जड्डूची जागा घेण्यासाठी 'हा' खेळाडू सज्ज, वाचा प्लेइंग 11

Press

आंतरराष्ट्रीय ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धा: इंडोनेशियाचा मुहंमद हलिम सिदिक विजेता, पुण्याच्या दर्शन पुजारी उपविजेता

Photo Courtesy: Twitter

डायरेक्ट हाणामारी! पहिल्याच षटकांत कर्णधार रोहितने पाकिस्तानला दिला विशेष संकेत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143