---Advertisement---

INDvPAK| वेगवान गोलंदाजी फळीला मजबूत बनवेल ‘हा’ पठ्ठ्या, आवेशची घेईल जागा; स्वत:च दिलीय हिंट

On: रविवार, सप्टेंबर 4, 2022 4:09 PM
Deepak-Chahar-KL-Rahul
---Advertisement---

भारतीय संघाला रविवारी (04 सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला दोन मोठे झटके बसले आहेत. भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तर वेगवान गोलंदाज आवेश खान याची तब्येत बरी नसल्याने तो पाकिस्तानविरुद्ध अनुपलब्ध असेल. अशात प्लेइंग इलेव्हनमध्ये राखीव खेळाडूंपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. आता राखीव खेळाडूंपैकी एकाने स्वत: आपल्या निवडीबद्दल संकेत दिले आहेत. 

भारताचा 30 वर्षीय वेगवान गोलंदाज दीपक चाहर याला प्लेइंग इलेव्हनमध्ये India’s Playing Xi) घेतले जाऊ शकते. तो राखीव खेळाडूच्या रूपात भारतीय संघासोबत युएईला आला आहे. तो सातत्याने इतर खेळाडूंसह सरावही करत आहे. अशात आवेश (Avesh Khan) पूर्णपणे फिट नसताना संघ व्यवस्थापन प्रतिभाशाली चाहरला (Deepak Chahar) खेळवण्याचा विचार करू शकते. त्यातही चाहरने स्वत सोशल मीडियाद्वारे याबद्दल हिंट दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

चाहरने आपला सराव सत्रातील व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने थ्री इडियट्स या बॉलिवूड फिल्ममधील डायलॉग लिहिला आहे. त्याने लिहिले आहे की, ‘यशाच्या मागे नका पळू. सर्वोत्कृष्ट गोष्टींचा पाठलाग करा, यश एका क्षणात तुमचा पाठलाग करेल.’

भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सध्या भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाज आहेत. अशात या वेगवान फळीला मजबूत बनवण्यासाठी चाहर योग्य पर्याय ठरू शकतो. परंतु अद्याप बीसीसीआयने चाहरबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. दुखापतग्रस्त रविंद्र जडेजाचा पर्यायी खेळाडू म्हणून अक्षर पटेलला निवडले गेले आहे. अशात तोदेखील प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याच्या संधी जास्त आहेत.

https://www.instagram.com/reel/CiE7G28JbN-/?utm_source=ig_web_copy_link

आशिया चषक 2022 साठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, दिनेश कार्तिक, आवेश खान, दीपक हुड्डा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---