fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानी दिग्गजाला माकडउड्या मारायला लावणाऱ्या किरण मोरेंची गोष्ट

Tariq A li Aiwan scores two twenty20 hundreds in a day

September 4, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे फलंदाजी, गोलंदाजी महत्त्वपूर्ण असते त्याच प्रकारे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षण यांना सुद्धा तितकेच महत्त्व आहे. भारतीय क्रिकेटमध्ये जनार्दन नवले यांच्यापासून सुरू झालेली यष्टीरक्षकांची यादी आजतागायत रिषभ पंतपर्यंत आली आहे. मधल्या काळात फारूक इंजिनियर, सय्यद किरमाणी, किरण मोरे, एमएस धोनी यांनी यष्टिरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमवले. त्याच पैकी एक असलेले किरण मोरे यांचा आज वाढदिवस.

४ सप्टेंबर १९६२ मध्ये बडोद्यातील एका सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड असल्याने ते नियमितपणे क्रिकेटचा सराव करत. फलंदाजीसोबतच त्यांनी यष्टीरक्षण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चांगल्या यष्टिरक्षकांची वानवा असल्याने, मोरे यांना चांगल्या कामगिरीमुळे लवकर लवकर संध्या मिळू लागल्या. १९७७ मध्ये त्यांची भारतीय युवा संघात निवड झाली. ते मुंबईतील टाईम्स शिल्डमधील टाटा स्पोर्ट्स क्लबकडून आणि १९८२ मध्ये नॉर्थ लँकशायर लीगमधील बॅरो संघाकडून खेळले.

१९८२-८३ वेस्टइंडीज दौऱ्यावर राखीव यष्टिरक्षक म्हणून त्यांची भारतीय संघात निवड झाली. मात्र, पहिल्या पसंतीचे यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांच्यामुळे त्यांना संधी मिळू शकली नाही. संपूर्ण दौर्‍यावर एकही सामना न खेळता ते मायदेशी परतले. किरण मोरे त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट १९८२-८३ ची रणजी ट्रॉफी स्पर्धा ठरली. सलग दोन सामन्यात नाबाद १५३ व नाबाद १८१ धावांच्या खेळ्या करत त्यांनी बडोदा संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले.

१९८४ मध्ये त्यांनी एकदिवसीय पदार्पण केले मात्र, त्या मालिकेत ते सपशेल अपयशी ठरले. त्या मालिकेत दुर्दैवाने ते एकही झेल घेऊ शकले नाहीत तसेच फलंदाजी करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आले. वर्षभर ते संघाच्या बाहेर होते.

मोरे यांनी आपल्या यष्टीरक्षण व फलंदाजीने १९८६ चा इंग्लंड दौरा गाजवला. या दौऱ्यात त्यांनी आपले कसोटी पदार्पण केले होते. यष्टिरक्षक म्हणून १६ झेल व फलंदाजी करताना ५२ च्या सरासरीने १५६ धावा काढल्या. त्यांची सरासरी संपूर्ण मालिकेत दुसऱ्या क्रमांकाची सरासरी होती.

किरण मोरे यांनी १९८८ च्या ऐतिहासिक चेन्नई कसोटीत ६ खेळाडू यष्टीचीत करण्याचा विश्वविक्रम केला होता. याच कसोटीत नरेंद्र हिरवाणी यांनी पदार्पण करत १६ बळी आपल्या नावे केले होते. तसेच, रवी शास्त्री यांचा कर्णधार म्हणून तो एकमेव सामना होता.

किरण मोरे यांच्या आयुष्यातील सर्वात महागात पडलेली चूक म्हणजे ग्रॅहम गूच यांचा सोडलेला झेल. १९९० च्या इंग्लंड दौऱ्यावर, लॉर्ड्स कसोटी दरम्यान किरण मोरे यांनी संजीव शर्मा यांच्या गोलंदाजीवर ग्रॅहम गूच यांचा ३६ धावांवर सोपा झेल सोडला होता. त्याच डावात गूच यांनी वैयक्तिक ३३३ धावसंख्या उभारली. पुढे तो सामना इंग्लंडने २४७ धावांनी जिंकला.

किरण मोरे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे १९९२ च्या विश्वचषकात जावेद मियांदाद यांच्याशी त्यांचा झालेला वाद. किरण मोरे यांच्या यष्ट्यांमागून होणाऱ्या सततच्या बडबडीने वैतागलेल्या मियांदाद यांनी मोरे यांच्यासमोर जाऊन माकडउड्या मारल्या होत्या. आजही भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यान कोणताही सामना असेल तर या घटनेचा हमखास उल्लेख होतो.

१९९७ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मोरे यांनी बडोदा येथे स्वतःची क्रिकेट अकादमी स्थापन केली. सध्या भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवत असलेले कृणाल व हार्दिक हे पांड्या बंधू किरण मोरे यांनीच शोधलेले हिरे आहेत. पांड्या बंधूंची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही मोरे यांनी त्या दोघांना मोफत क्रिकेट प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. दोघांमधील प्रतिभा ओळखत मोरे यांनी पांड्या बंधूंना मोठ-मोठ्या स्पर्धात संधी दिली. आजही, हार्दिक व कृणाल किरण मोरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात.

मोरे २००२ ते २००६ या काळात भारतीय क्रिकेट संघाच्या निवडसमितीचे अध्यक्ष राहिले. गांगुली-चॅपल वादावेळी मोरे यांनी गांगुलीला संघाबाहेर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्यांना प्रसारमाध्यमे व क्रिकेटचा त्यांचा रोष ओढावून घ्यावा लागला होता.

मोरे यांनी एका वर्षानंतर अजून एका मोठ्या वादाला आमंत्रण दिले. २००७ मध्ये बंडखोर इंडियन क्रिकेट लीगमध्ये कार्यकारी संचालक म्हणून ते सामील झाले. त्यानंतर बीसीसीआयने किरण मोरे आणि कपिल देव यांच्यासह काही जणांवर बंदी घातली.

२०१६ मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या “एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी” या चित्रपटासाठी धोनीची भूमिका करणारा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला प्रशिक्षण देण्याचे काम मोरे यांनी केले होते. याचसोबत त्या चित्रपटात छोटीशी भूमिका त्यांनी केली होती.

सध्या ते बडोदा येथे स्वतःची क्रिकेट अकादमी चालवतात. तसेच मुंबई इंडियन्ससाठी युवा खेळाडू शोधण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग लेख-

-६० च्या दशकातील वेस्ट इंडिज संघाचे संकटमोचक बसील बूचर

-काय तर, बेल्स हरवल्यामुळे सामना सुरु झाला नाही!

-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट

महत्त्वाच्या बातम्या-

-सुरेश रैना आयपीएल खेळणार नसल्याची ‘या’ खेळाडूने केली होती सहा वर्षांपूर्वी भविष्यवाणी

-आरसीबीच्या ‘या’ खेळाडूने सर्वांसमोर दिली होती गर्लफ्रेंडला शिवी, आता होतं नाहीये लग्न

-न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचा निर्णय: ‘या’ दिग्गजाची प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती


Previous Post

पोलार्ड टी२०चा उत्तम खेळाडू, पण कसोटी क्रिकेट खेळण्यास योग्य नाही, पहा कोण म्हणलंय असं

Next Post

गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते पण….

Related Posts

Photo Curtsey: Facebook/Bal Thackeray
क्रिकेट

गोष्ट त्या क्रिकेटरची, ज्याची प्रतिभा अक्षरक्ष: बाळासाहेब ठाकरेंना मैदानावर येण्यास भाग पाडायची

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/BBL
क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्स, याला संघात घ्या! अवघ्या ५१ चेंडूत शतक करणाऱ्या ‘त्या’ पठ्ठ्यासाठी नेटकऱ्यांची मागणी

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम! केवळ दहा मिनिटे सामना बघेन म्हणतं शेवटपर्यंत जागेवरुन हाललेही नाहीत

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

“वॉशिंग्टन सुंदरकडे ब्रिस्बेन कसोटीत खेळण्यासाठी पॅड्स नव्हते, मग..”, प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

January 23, 2021
क्रिकेट

ऑटोचालकाचा मुलगा ते बीएमडब्ल्यूचा मालक! मोहम्मद सिराजने स्वतःलाच गिफ्ट केली महागडी कार; पाहा फोटो

January 23, 2021
Photo Curtsey: Twitter/Ajinkya Rahane
क्रिकेट

“५ महिने, २ देश अन् ८ शहर फिरून..”, घरी पतरल्यानंतर लेकीसोबतचा फोटो शेअर करत अजिंक्यने मांडल्या भावना

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

गावसकरांनी ४३८ धावांचे लक्ष्य जवळपास गाठून दिले होते पण....

Photo Courtesy: Facebook/ICC

आश्चर्यच! या खेळाडूने एकाच दिवशी २ वेगवेगळ्या सामन्यात केले होती शतकं

Photo Courtesy: Twitter/ BCCI

वनडे सामन्यांसाठी हे ५ भारतीय खेळाडू आहेत उत्तम, पण त्यांनी टी-२० ला करावा रामराम

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.