रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हारला आहे. आता मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारतीय संघ कोणत्याही थराला जाण्यास तयार असेल. अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनबाबत कठोर निर्णय घेऊ शकतो. भारतीय संघाला 2024 ची सुरुवात विजयाने करायची आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला कठोर निर्णय घेणे भाग पडू शकते.
रोहित शर्मा (Rohit Sharma) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करू शकतो. पहिला बदल वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा (Prasidh Krishna) याच्या रूपाने होऊ शकतो, ज्याने सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. मुकेश कुमार (Mukesh Kumar) ऐवजी कृष्णाला प्राधान्य देत प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले, पण तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. पदार्पणाच्या सामन्यात, प्रसिध कृष्णाला फक्त 1 विकेट्स घेता आली आणि त्याने 4.70 च्या सरासरीने धावा खर्च केल्या.
अशा स्थितीत रोहित शर्मा प्रसिध कृष्णाला वगळून दुसऱ्या कसोटीत मुकेश कुमारचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतो. दुसऱ्या कसोटीपूर्वी प्रॅक्टिसमध्ये रोहित शर्माने मुकेश कुमारशी गोलंदाजीबाबत बराच वेळ चर्चा केली होती. याशिवाय दुसरा बदल अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra jadeja) याच्या रूपात होऊ शकतो. पहिल्या कसोटीत जडेजा फिट नव्हता. आता जर जडेजा दुसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त झाला तर तो आर अश्विन (R Ashwin) याची जागा घेणार हे जवळपास निश्चित आहे. जडेजाच्या उपस्थितीत अश्विनला बाहेर बसावे लागू शकते.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत न्यूलँड्सवर एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना 4 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे आणि 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. (Question of Team India’s honour; Rohit Sharma may have to make ‘this’ decision in the second Test)
भारताचा संभाव्य संघ –
रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, शार्दुल ठाकूर.
हेही वाचा
नेथन लायनबद्दल माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी, म्हणाला, ‘मला आशा आहे की तो माझा…’
अफगाणिस्तान क्रिकेटचा ट्रॉटवर विश्वास! वर्ल्डकप परफॉर्मेंसमुळे भारत दौऱ्यात मुख्य प्रशिक्षकपदी कायम