जगातील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या नव्या हंगामात मागील दोन हंगामाचे अपयश भरून काढण्याचा प्रयत्न मुंबई इंडियन्स संघ करणार आहे. आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व यावेळी दोन खेळाडू करण्याची शक्यता वर्तवली जातेय.
तब्बल पाच वेळा आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्मा 2013 पासून करत आहे. त्याच्याच नेतृत्वात मुंबईने ही पाचही विजेतेपदे पटकावलीत. मात्र, आयपीएल 2023 मध्ये संपूर्ण हंगामात रोहित मुंबईचे नेतृत्व करण्याची शक्यता कमी आहे. एका आघाडीच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार,
“पुढील आयपीएलमध्ये रोहित शर्मा काही सामन्यांमध्ये बाकावर बसू शकतो. त्याच्या नेतृत्वात सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करेल. बीसीसीआय सोबतच्या चर्चेनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जातेय.”
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने सर्व फ्रॅंचाईजीशी आगामी आयपीएलबाबत चर्चा केली होती. यामध्ये खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटबाबत काही निर्णय घेतले गेलेले. त्यामध्ये भारतीय संघात सध्या खेळत असलेल्या काही प्रमुख खेळाडूंना आयपीएलमध्ये सर्व सामने खेळण्यास मनाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. सूर्यकुमार यादव याला नेतृत्वाचा फारसा अनुभव नसला तरी, तो संघातील महत्त्वाचा सदस्य असल्याने त्याच्याकडेच ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ –
आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, डेवाल्ड ब्रेविस, ऋतिक शौकीन, ईशान किशन, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमराह, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय सिंग, मोहम्मद अरशद खान, तिलक वर्मा, रमनदीप सिंग, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, कॅमरून ग्रीन, झाय रिचर्डसन, पीयूष चावला, डुआन जॅनसन, विष्णु विनोद, शम्स मुलानी, नेहल वधेरा, राघव गोयल.
(Rohit Sharma might sit out of a few IPL matches this season to manage his workload Suryakumar Yadav will lead Mumbai Indians in his absence)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“आता मी 10 पट चांगला गोलंदाज बनलोय”, युवा गोलंदाजाने व्यक्त केली पुनरागमनाची आशा
अशी असावी अर्धांगिनी! धोनीला कर्णधारपदावरून काढल्यानंतर साक्षीने घेतलेला संघमालकाशी पंगा