टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिके पुढे ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला धक्के बसले. मात्र, त्यानंतर डेव्हिड मिलर व ऐडन मार्करम या जोडीने शानदार खेळ दाखवत संघाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला. चांगल्या सुरुवातीनंतर भारतीय संघाने केलेल्या खराब क्षेत्ररक्षणामुळे संघाला सामना गमवावा लागला.
विजयासाठी मिळालेल्या 134 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. अर्शदीपने दुसऱ्या षटकात दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. संघाच्या 24 धावा झालेल्या असताना कर्णधार बवुमानेही संघाची साथ सोडली. त्यानंतर डेव्हिड मिलर व ऐडन मार्करम यांनी सुरुवातीला सांभाळून खेळत डाव उभारणीवर भर दिला. भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले असताना मिलर व मार्करमने त्यांना बाद करण्याची संधी देखील दिली. आधी विराटने मार्करमचा एक सोपा झेल सोडला. मात्र, त्यानंतर रोहितने त्याला धावबाद करण्याची दवडलेली संधी टर्निंग पॉईंट ठरली.
Mass Captaincy from Rohit Sharma, Gave Ashwin 18th over and finished the game early 🙏
Can't win even a single game when situation isn't in his hands + Missed easy Runout of Miller who won the game
Mr Captain Clueless @ImRo45 🙌🔥#INDvsSA pic.twitter.com/4WhMmNzxK5— Pranjal (@Pranjal_one8) October 30, 2022
https://twitter.com/zihadhasan85/status/1586734038144151553
मोहम्मद शमी टाकत असलेल्या 13 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मार्करमने खेळपट्टीच्या जवळपास चेंडू ढकलत एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू जवळच उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. तोपर्यंत नॉन स्ट्राइकवरील डेव्हिड मिलर धावत आल्याने मार्करमनेही धाव घेण्याचा निर्णय घेतला. मार्करम खेळपट्टीच्या मध्यात असताना रोहित सहजरीत्या थेट फेक करत त्याला धावबाद करू शकत होता. त्याने तसा प्रयत्नही केला. मात्र, तो नेम साधू शकला नाही व मार्करमला जीवदान मिळाले. पुढे तीन षटके आणखी खेळत मार्करमने अर्धशतक पूर्ण करत दक्षिण आफ्रिकेला सुस्थितीत नेले. अखेरीस मिलरने नाबाद राहत आपल्या संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तान सेमीफायलमधून बाहेर झाल्यावर आनंद होईल, पण…’, बीसीसीआय अध्यक्षांचे मोठे वक्तव्य
“जर रिषभ पंत पाकिस्तानात असता, तर वर्ल्डकपमधून कधीच बाहेर बसवलं नसतं”