ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंड व भारत यांच्यादरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे आहे. नाणेफेक गमावल्यानंतर ही प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा व केएल राहुल यांनी शतकी भागीदारी करत भारताला फ्रंटफूटवर आणले आहे. मात्र, या मैदानावर शतक ठोकण्याचे रोहित शर्माचे स्वप्न जेम्स अँडरसनच्या एका अप्रतिम चेंडूने भंगले.
अँडरसनने केला रोहितचा स्वप्नभंग
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात अनुभवी रोहित शर्माने जबाबदारीने खेळ करत भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली. संघाला शतकी मजल मारून दिल्यानंतर तो वैयक्तिक शतकाच्या दिशेने आगेकूच करत होता. त्याची फलंदाजी पाहता तो हे शतक पूर्ण करेल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने सर्वांच्या अपेक्षाभंग केला.
You absolute beauty @jimmy9!! 😍
Scorecard/Clips: https://t.co/GW3VJ3wfDv
🏴 #ENGvIND 🇮🇳 |#RedForRuth pic.twitter.com/fXzZRb5YPY
— England Cricket (@englandcricket) August 12, 2021
आपल्या दुसऱ्या स्पेलच्या दुसऱ्या षटकात अँडरसनने अप्रतिम चेंडू टाकत रोहितचा त्रिफळा उडवला. रोहितने १४५ चेंडूंचा सामना करत ८३ धावांची अप्रतिम खेळी केली. यामध्ये ११ चौकार व एका षटकाराचा समावेश होता. रोहितने हे शतक पूर्ण केले असते तर तो लॉर्ड्सवर शतक झळकावणारा दहावा भारतीय फलंदाज ठरला असता.
या भारतीयांनी ठोकली आहेत लॉर्डसवर शतके
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर शतक ठोकणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात प्रतिष्ठेचे समजले जाते. विनू मंकड हे या मैदानावर शतक ठोकणारे पहिले भारतीय होते. त्यानंतर दिलीप वेंगसरकर यांनी या मैदानावर तीन शतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त गुंडाप्पा विश्वनाथ, रवी शास्त्री, मोहम्मद अजहरुद्दिन, सौरव गांगुली, अजित आगरकर व राहुल द्रविड यांनी या मैदानावर शतक साजरे केले असून, २०१४ मध्ये अखेरच्या वेळी या मैदानावर अजिंक्य रहाणेने भारतीय म्हणून शतक ठोकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/james-anderson-bowled-out-rohit-sharma-83-runs-india-is-on-126-runs/
टॉस अन् विराटचं जरा वाकडंच! इंग्लंडमध्ये आठव्यांदा कोहलीने गमावली नाणेफेक, केला नकोसा विक्रम
दशकभरात जे जमले नाही ते ‘रोहित’ आल्यापासून साध्य होतय! पाहा ही आकडेवारी